वाहतूक कोंडीचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे सातारा ; क्रांतिसिंह नाना पाटील चौक ठरतोय

प्रभात  स्पेशल

फलटण – फलटण शहरात असणारा क्रांतीसिंह नाना पाटील चौक हा दिवसेंदिवस वाढत असलेल्या वाहतूक कोंडीमुळे मृत्यूचा सापळा ठरु लागला आहे. त्यामुळे नव्याने रिंगरोडची निर्मिती करुन शहरातून सुरु असलेली वाहतूक शहराबाहेरुन वळविण्यात यावी अशी मागणी समस्त फलटणकरांमधून होत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

फलटण शहरातील क्रांतीसिंह नाना पाटील चौकातील वाहतुकीचा प्रश्‍न दिवसेंदिवस जटील होत चालला आहे. या चौकात सातत्याने वाहतूक ठप्प होत असून नागरिकांतून तीव्र भावना व्यक्त केल्या जात आहे. कोंडीचा नागरिकांना विशेषत: शालेय विद्यार्थी, महिलांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. शिवाय या चौकात सातत्याने होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे अपघात होऊन अनेकांचा बळी गेला आहे तर अनेकजण जायबंदी झाले आहेत. त्यामुळे प्रशासनाने या चौकातून जाणारी वाहतूक शहराबाहेरून रिंग रोड काढून वळविण्याची मागणी होत आहे.

येथील क्रांतीसिंह नाना पाटील चौकातून पुणे-पंढरपूर तसेच नगर – सांगली हे महामार्ग जात आहेत. त्यामुळे या रस्त्यावर अवजड वाहनाची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. तसेच या रस्त्यावरून पंढरपूर, शिखर शिगणापूर, जेजुरी, तुळजापूर गाणगापूर, अक्कलकोट, गोंदावले, म्हसवड, शिर्डीसह इतर तीर्थक्षेत्राला जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या चौकालगतच फलटण एसटी बसस्थानक असल्यामुळे एसटी वाहतूकही मोठ्या प्रमाणात होत असते. सध्या साखर कारखाने सुरू झाले असून जिल्ह्यातील तसेच जिल्ह्याबाहेरील सहा ते सात साखर कारखान्यांसाठी होणारी ऊसाची वाहतूकही याच चौकातून जात असल्यामुळे फलटणचा हा चौक वाहतूक कोंडीचे आगारच ठरत आहे.

फलटण शहराचा वाढता विस्तार, वाढती लोकसंख्या, शहरामध्ये वाढत असलेले व्यवसाय, वाहनांची वाढती संख्या पहाता ही वाहतूक फलटण शहराबाहेरून रिंग रोड काढून वळवण्याची आवश्‍यकता आहे. या गंभीर बाबीकडे लोकप्रतिनिधी तसेच प्रशासनाने लक्ष घालून या चौकातील वाहतूकीचा प्रश्‍न लवकरात लवकर मार्गी लावावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

पोलीस प्रशासनाचा नियोजनशुन्य कारभार क्रांतीसिह नाना पाटील चौक हा वाहतूक कोंडीचे आगार ठरत आहे. बेशिस्त आणि मोठ्या प्रमाणात होणाऱ्या वाहतुकीमुळे या चौकातील अपघातांचे प्रमाणाही वाढले आहे. मात्र, या चौकातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी तसेच अपघातांचे प्रमाण कमी व्हावी यासाठी पोलीस प्रशासनाकडून कोणत्याही ठोस उपाययोजना झाल्याचे आजवरतरी पहावयास मिळाले नसल्याने फलटणमध्ये पोलीस प्रशासनाचा कारभार हा नियोजनशुन्यच असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहेत. अतिक्रमणांचा अडसर फलटण शहरातील महत्वाचा समजल्या जाणाऱ्या क्रांतीसिंह नाना पाटील चौकात अनेक व्यावसायिकांनी अतिक्रमणे केली आहेत. रस्त्याकडेलाच दुकाने, टपऱ्या थाटल्या आहेत.

जीवावर बेतणारी वाहतूक कोंडी अन्‌ निद्रीस्त प्रशासन

केवळ शहरांमध्येच नाही तर ग्रामीण भागातीलही अनेक महत्वाच्या बाजारपेठांच्या गावांमध्ये वाहतूक कोंडीच्या समस्या उद्‌भवू लागली आहे. ही समस्या सोडविण्यासाठी प्रशासनासह लोकप्रतिनिधीही पुढाकार घेताना दिसत नाही. विशेषत: सातारा, वाई, कराडसह फलटण या महत्वाच्या शहरांमध्ये वाहतूक कोंडीची समस्या ही नित्याचीच बाब ठरू लागली आहे. यामुळे वाहनधारकांसह स्थानिक नागरिकही त्रासले आहे. मात्र, नागरिकांच्या सुखसोयींकडे लक्ष देण्यासाठी निद्रीस्त प्रशासनाला वेळच मिळत नसल्याचे चित्र निर्माण झाले असून जिल्ह्यातील वाहतूक कोंडीचा दै. प्रभातने घेतलेला हा आढावा


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)