वाहतूकदारांचा 20 जुलैपासून बेमुदत चक्‍काजाम

पिंपरी – वाहतूकदार व्यावसायिकांच्या विविध मागण्यांकडे सरकारचे होत असलेले दुर्लक्ष तसेच सततच्या इंधन दरवाढीच्या निषेधार्थ 20 जुलैपासून बेमुदत चक्‍काजाम आंदोलन करणार असल्याची माहिती ऑल इंडिया ट्रान्सपोटर्स असोसिएशनचे कार्याध्यक्ष प्रमोद भावसार यांनी दिली.

ऑल इंडिया ट्रान्सपोटर्स असोसिएशनच्या 205 व्या कार्यकारणीची नुकतीच बैठक झाली. यामध्ये भाजप सरकार वाहतूकदारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. सरकारच्या धोरणावर व्यावसायिकांचा विश्‍वास राहिला नाही. आमच्या अडचणीबाबत कायम अनास्था दाखवली जात असल्याचा आरोप करत 20 जुलै 2018 पासून राष्ट्रव्यापी चक्का जाम करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

इन्शुरन्सच्या टीपीपी हप्त्यामधील दरवाढ, डिझेलमधील असह्य सततची दरवाढ, अन्यायकारक टोल वसुली धोरण, प्रवासी वाहनासाठी राष्ट्रीय पातळी वरील परमीट बंधन, रस्त्यावरील पोलीस व परिवहन विभागाचा भ्रष्टाचार आणि छळवणूक , ई वे बिल आणि तातडीचे भाडे आदींचे वाहतूकदारांवरील बंधन, बस व्यावसायिक आणि दुहेरी चालक, त्यांचे गणवेश, दाखला धोरण, आयकर कलम 44 ए मधील दुरुस्ती आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत असल्याची माहिती भावसार यांनी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)