वाहतुकीच्या गोंधळामुळे एकेरीला ब्रेक

सातारा – वाहतुकीला शिस्त लागावी यासाठी सात वर्षापूर्वी सुरू झालेल्या सातारा शहरातील एकेरी तात्पुरता ब्रेक लागला आहे. दरम्यान, सध्या सुरु असलेल्या ग्रेड सेपरेटच्या कामामुळे शहरात मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे. त्यापार्श्‍वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तात्पुरता का होईना पण एकेरीला ब्रेक लागला आहे.

सातारा शहरात होत असलेली वाहतूक कोंडी अन्‌ त्याविरोधात सातारकरांनी वेळोवेळी उठवलेला आवाज याचा विचार करून तत्कालीन जिल्हाधिकारी रामास्वामी व तत्कालीन जिल्हा पोलीस प्रमुख के. एम. एम. प्रसन्ना यांनी सातारा शहरात 10 ऑगस्ट 2011 ते 1 नोव्हेबंर 2011 या कालावधीत प्रायोगिक तत्वावर एकेरीचा प्रयोग राबविला होता. त्याला सातरकरांनी दिलेला प्रतिसाद लक्षात घेता 01 नोव्हेबेर 2011 पासून एकेरी वाहतुक कायमस्वरूपी करण्यात आली होती. मात्र, सातारा शहरात सुरू असलेल्या ग्रेड सेपरेटरच्या कामामुळे शहरातील वाहतुकीवर येत असलेला ताण लक्षात घेत नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी जिल्हा पोलीस प्रमुख संदीप पाटील यांनी एकेरी वाहतुक तात्पुरती बंद करण्याचा आदेश दिल्याने तब्बल सात वर्षानंतर सातारा शहरातील एकेरीला ब्रेक लागला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)