वाहतुकीचे नियमन करणाऱ्या पोलिसाला मारहाण करणाऱ्याला सक्तमजुरी

पुणे, दि. 12 (प्रतिनिधी) – वाहतुकीचे नियमन करणाऱ्या पोलीस हवालदाराला शिवीगाळ करत लाकडी बांबूने मारहाण करणाऱ्यास 3 वर्षे सक्तमजुरी आणि 12 हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनवली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. जे. घरत यांनी हा आदेश दिला आहे. दंडाची रक्कम न भरल्यास 3 महिने अतिरिक्त कारवास भोगावा लागेल, असेही न्यायालयाने आदेशात नमूद करण्यात आले आहे.
मुज्जमील अस्लम बागवान (वय 26, रा. बिबवेवाडी) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार दत्तात्रय किसनराव खाणेकर (वय 48) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना 11 ऑक्‍टोंबर 2015 रोजी शिवाजी रस्त्यावरील गोटीराम भैय्या चौकात सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. घटनेच्या दिवशी फिर्यादी हे वाहुतक नियमनाचे काम करत होते. त्यावेळी, मुज्जमील तेथे गेला. त्याने फिर्यादींना वाहतुक नियमनाचे काम चांगले करा असे सांगत अपशब्द वापरून शिवीगाळ केली. त्यानंतर त्याच्या हातातील लाकडी बाबूं चेहऱ्यावर मारून फिर्यादींना जखमी केले होते. या प्रकरणी सरकारी कामात अडथळा आणणे तसेच परिसरात दहशत पसरविल्याप्रकरणी मुज्जमील याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी खडक पोलिसांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. न्यायालयाने मुज्जमील याला दोषी ठरवत 3 वर्षे सक्तमजुरी आणि 12 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. या खटल्यात सहाय्यक जिल्हा सरकारी वकील गिरीजा देशपांडे यांनी काम पाहिले. गुन्ह्यात तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक इप्पर यांनी केला. पैरवी अधिकारी म्हणून पोलीस उपनिरीक्षक एम. एच. तडवी यांनी काम पाहिले. त्यांना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक डी. डी. मांडेकर यांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)