वाहतुकीचीही “संथ’तधार

पावसामुळे गती मंदावली : पेठांमधील रस्ते जाम

पुणे – गेल्या काही दिवसांपासून सतत सुरू असलेल्या पावसाने सोमवारी काही प्रमाणात विश्रांती घेतली होती. पण, मंगळवारी पहाटेपासून संततधार पावसामुळे वाहतूक व्यवस्था पुरती कोलमडली. गती मंदावल्याने चाकरमान्यांना मनस्ताप सहन करावा लागला. तर, वाहतूक कोंडीत स्कूल व्हॅन्स कोंडी सापडल्याने विद्यार्थ्यांनाही याचा फटका बसला. यात शहरातील सर्वच मुख्य रस्ते जाम झाले होते.

मंगळवारी सकाळपासूनच जंगली महाराज रस्ता, कर्वे रस्ता, सेनापती बापट रस्ता, बाजीराव रस्ता आणि टिळक रस्त्यावर वाहनांच्या लांबलचक रांगा होत्या. येथून प्रवास करणाऱ्यांना वाहतूक कोंडीमुळे मनस्ताप सहन करावा लागला. विशेषतः दत्तवाडी, डेक्कन परिसर, सदाशिव पेठ, नारायण पेठांमधील रस्ते जाम झाले. धरणांतून विसर्गामुळे नदीपात्रातील रस्ता आणि भिडे पूल वाहतुकीसाठी बंद होता. त्याचा ताण डेक्‍कन परिसर, फर्ग्युसन कॉलेज रस्ता, जंगली महाराज रस्त्यासोबतच सदाशिव पेठ, नारायण पेठेतील रस्त्यांवर आल्याने हे रस्तेदेखील जाम झाले. यामुळे दिवसभर या भागातील वाहतूक संथगतीने सुुरू होती.

नळस्टॉप-डेक्‍कन प्रवासाला तासभर
दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास नळस्टॉपपासून डेक्कनपर्यंत येण्यासाठी तब्बल तासभर लागल्याचे काही वाहनचालकांनी सांगितले. बेशिस्त वाहनचालक, रस्त्याच्या कडेला उभी केलेली वाहने यामुळे वाहनचालकांना कसरत करावी लागत होती. संततधार पावसातही या मार्गावर वाहतूक कोंडी होते. त्यात मेट्रोच्या कामामुळेही वाहतुकीला फटका बसला.

नदीपात्रातून जाणाऱ्या वाहनांची संख्या दररोज मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, विसर्गामुळे हा रस्ता बंद असल्याने या मार्गावरील वाहतूक पर्यायाने मुख्य रस्त्यांवरुन होत आहे. यामुळे काही प्रमाणात गर्दी वाढते. विसर्ग कमी झाल्यास लगेच भिडे पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल. वाहतूक पोलिसांकडून कोंडी सोडवण्यासाठी प्रयत्न केले जात आहे.
– सुनील भोसले, पोलीस निरीक्षक, डेक्कन वाहतूक विभाग

हे रस्ते होतायेत जाम
– सेनापती बापट रोड
– टिळक रोड
– कर्वे रोड
– डेक्कन परिसर
– सिंहगड रोड
– स्वारगेट मुख्य चौक
– पौड रोड
– नळस्टॉप चौक
– बाजीराव रोड
– सातारा रोड
– मालधक्का चौक
– अप्पा बळवंत चौक


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)