वाहतुकदारांच्या जमिनीवर बॅंकेचा बोजा

प्रातिनिधिक छायाचित्र

 जमिनीच्या जप्तीचे आदेशकोरेगाव तालुक्‍यात खळबळ
कोरेगाव– डॉ. शालिनीताई पाटील जरंडेश्‍वर कारखान्याच्या चेअरमन असताना गळीत हंगाम चालवण्यासाठी पंधरा वर्षापूर्वीवाहतुकदारांच्या नावावर कराड जनता बॅंकेकडून जवळपास 10 कोटीच्या थकीत कर्ज घेतले होते. त्याच्या वसुलीसाठी सहकार न्यायालयाच्या आदेशाने संबंधितांच्या शेतजमिनीवर बोजा चढवण्याचे आणि जप्तीचे आदेश बजावल्याने कोरेगाव तालुक्‍यात एकच खळबळ उडाली आहे. या अन्यायाच्या विरोधात कोरेगाव तालुक्‍यातील 70 ऊस वाहतूक करणाऱ्या कर्जबाजारी शेतकऱ्यांनी साखर व्यवस्थापनाच्या विरोधात जनआंदोलन करण्याचा निर्धार व्यक्‍त केला आहे.

कराड जनता बॅंकेने शेतकऱ्यांच्या शेतजमिनीवर कर्जाचे बोजे चढवण्याचा आणि शेतजमिनी जप्ती करण्याचे आदेश बजावल्याने संबंधित शेतकऱ्यांनी व्यवस्थापनाच्या विरोधात प्रांताधिकारीतहसीलदारसहाय्यक निबंधक तसेच जिल्हा उपनिबंधक यांना लेखी निवेदन दिले. आजअखेर ऊस वाहतूक करणाऱ्या शेतकऱ्यांनी सन 2003 साली घेतलेल्या कर्जाची थकीत रक्‍कम 9 कोटींच्या पुढे गेली आहे. या 158 शेतकऱ्यांच्या नावे बॅंकेने टाकलेल्या थकीत कर्जाच्या वसुलीची कारवाई सुरू झाली आहे. सहकार न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार शेतकऱ्यांच्या शेतजमिनीवर कराड जनता बॅंकेने प्रत्येकी चार लाखांच्या रकमेचे बोजे चढवले आहेत. शेतकऱ्यांच्या जप्तीचे आदेशस सहकार न्यायालयाने बजावले आहेत. त्यामुळे शेतकरी संतापले आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सर्व संबंधित शेतकऱ्यांनी कोरेगाव येथील बाजार समितीच्या सभागृहात एक बैठक घेवून कराड जनता बॅंकेच्या विरोधात जनआंदोलनाचा इशारा दिला आहे. तसेच जनआंदोलन करण्याचे निवेदनही कोरेगावच्या वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिले. या बैठकीला सदाशिव पवारदुष्यंतराजे शिंदेयुवराज कदमविष्णू साळुंखेसुरेश सकुंडेविजय चव्हाणविलासराव बर्गेनंदकुमार बोधेदत्तात्रय कदम,हणमंत जगतापगोपीनाथ निकमअनिल फाळकेदिलीप फाळकेतानाजी मानेमदन मानेसुनील वीरअविनाश देशमुखहणमंत खाडेउत्तम मुळीकजगन्नाथ सावंत यांच्यासह कोरेगावखटावसातारा तालुक्‍यातील 70 शेतकरीऊस वाहतूकदार या बैठकीला उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)