वाहकांच्या बेजबाबदारपणामुळे दोन बसेसचा अपघात

सुरुर येथील घटना : दोन्ही बसेस महाबळेश्‍वर डेपोच्या
भुईंज- महाबळेश्वर आगारातील एसटी चालकांच्या बेजबाबदारपणामुळे मुंबई आणि बोरीवली या दोन्ही एसटींना महामार्गावरील सुरुर गावच्या हद्दीत अपघात झाला. या अपघातात अनेक प्रवासी जखमी झाले आहेत.

अधिक माहिती अशी, महाबळेश्वर आगाराच्या एशीयाड बस महाबळेश्वर ते मुंबई आणि महाबळेश्वर ते बोरीवली या दोन्ही बसेस महाबळेश्वर येथून 9 वाजता निघाल्या. या बसेस वाईमार्गे सातारा पुणे महामार्गा वरील सुरुर गावच्या हद्दीतील उड्डाण पुलाच्या वळणावर आल्या असताना एशियाड हि पुढे येऊन प्रवासी घेण्यासाठी एका हॉटेलसमोर थांबली होती. त्या पाठोपाठ वळणावरच भरघाव वेगात आलेली बोरिवली या लालपरी बसवरील चालकाचा ताबा सुटल्याने तो पुढे उभ्या असलेल्या एशियाड बसवर जाऊन आदळला.

-Ads-

अपघाता घडताच घटनास्थळावरील हॉटेल व्यावसायिक अमोल धुमाळ यांनी आपल्या कामगाऱ्यांसह एसटीतील जखमी प्रवाशांना बाहेर काढले. अपघातात पाच प्रवासी गंभीर जखमी झाले असून एका महिला प्रवाशाच्या तोंडाला गंभीर दुखापत झाली आहे. दरम्यान, अपघातानंतर जखमी प्रवाशांना उपचारासाठी रुग्णालयात नेने आवश्‍यक असताना दोन्हीही बसेसच्या चालकांनी संगणमत करुन सर्व प्रवाशांना दुसऱ्या एसटीत बसवून मुंबईकडे पाठविले. तसेच अपघाताची नोंदही पोलीस ठाण्यात करण्यात आलेली नव्हती. मात्र, सुरुर येथील महिला पोलीस पाटील निर्मला पवार यांनी अपघाताची माहिती भुईंज पोलिसांना दिल्याने पोलीस घटनास्थळी पोहचले. परंतु, पोलिसांचा ससेमिरा मागे लागु नये म्हणुन या दोन्हीही बसेस तेथून निघुन गेल्या होत्या.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)