वास्तविकतेची जाणीव करून देणारा पराभव- भूवनेश्वर कुमार

हॅमिल्टन: भारत विरुद्ध न्यूझीलंड मालिकेतील चौथ्या एकदिवसीय सामन्यात भारताला मानहानीकरक पराभवाला सामोरे जावे लागले आहे. सलग तीन सामन्यातील विजयानंतर पत्करावा लागलेला हा पराभव वास्तविकतेचे भान ठेवण्यास लावणारा आहे, असे मत सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत भारताचा जलदगती गोलंदाज भुवनेश्वर कुमारने मांडले आहे.

भारताच्या बलाढय संघाला प्रथम फलंदाजी कारतना 100 धावाही करता आल्या नाहीत. भारत सर्वबाद 92 पर्यंतच मजल मारू शकला. त्यानंतर गोलंदाजीतही काही चमत्कार घडू शकला नाही आणि न्यूझीलंडने हा सामना 8 गडी राखून जिंकला.
या पराभवाबाबत बोलताना भुवनेश्वर म्हणाला, तुम्ही जर मागील काही महिन्यांतील आमचा खेळ पहिला तर तुम्हाला समजेल की आम्ही खूपच स्पर्धात्मक खेळ केला आहे. काही महिने सतत जबरदस्त खेळ केल्यावर एखाद्या सामन्यात तुम्ही खराब खेळ करणे साहजिकच आहे. पुढील सामन्यांत चांगली कामगिरी करणे हेच आमचे लक्ष्य असणार आहे. मालिकाविजय संपादित केल्यावर आमचा अविश्वास वाढला होता; परंतु या सामन्यात आम्ही चांगली कामगिरी करू शकलो नाही. काही गोष्टी आम्ही ठरवल्याप्रमाणे झाल्या नाहीत. तरीही न्यूझीलंडने आमच्यापेक्षा सरस खेळ केला हे मान्य करावे लागेल.

न्यूझीलंडच्या ट्रेंट बोल्टने 21 धावा देत 5 तर कोलिन डीग्रॅंडहोमने 26 धावात 3 बळी घेत भारतीय फलंदाजीतील हवाच काढली होती. त्यांनी भारतीय फलंदाजीतील कच्चे दुवे शोधले आहेत का? याचे उत्तर देताना भुवनेश्वर म्हणाला, मला तसे वाटत नाही. कारण आम्ही इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलियामाध्ये जाऊन विजय मिळवले आहेत. या सामन्यात त्यांच्या गोलंदाजांनी काही न खेळता येणारे चेंडू फेकले, त्यामुळे ते भारतीय फलंदाजांना बाद करू शकले. सामन्याअगोदर मी खेळपट्टीची पाहणी केली होती. त्यावेळी ही खेळपट्टी फलंदाजांना मदत करेल असे वाटले होते. परंतु, खेळपट्टीने अचंभीत केले. त्यातच बोल्ट आणि कॉलिनने अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत न्यूझीलंडला विजयाची संधी निर्माण करून दिली, असेही तो म्हणाला.

विराट कोहलीची अनुपस्थिती आणि मधल्या फळीतील फलंदाजांच्या अपयशाबाबत बोलताना भुवनेश्वर म्हणाला, विराट संघात नसल्यास संघाची ताकद कमी होते; परंतु विराटवर जास्त अवलंबून राहणे संघाच्या हिताचे नाही. विराटच्या अनुपस्थितीमुळे नवोदित शुभमनला संधी मिळाली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)