वासुली येथून लोखंडी पत्रे लंपास

वाकी – तीन दुचाकींवर आलेल्या चोरट्यांनी वासुली (ता. खेड) गावच्या हद्दीतील एस. व्ही. जे. इन्फोकोन प्रा. लि. कंपनीच्या मोकळ्या जागेत असलेले नवीन लोखंडी पत्रे एका टेम्पोमध्ये भरून लांबविल्याची प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी चाकण पोलिसांनी आज (शनिवारी) अज्ञात चोरट्याविरुद्ध चाकण पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. अजय अशोक कारले (वय 20, मूळ रा. आंबेठाण, सध्या रा. खालुंब्रे, ता. खेड) यांनी फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, वासुली येथील कंपनीच्या मोकळ्या जागेत 25 हजार रुपये किमतीचे महागडे लोखंडी पत्रे ठेवण्यात आले होते. गुरुवारी (दि. 9) रात्री अकराच्या सुमारास तीन दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी एका टेम्पोमध्ये (क्रमांक समजला नाही) 25 हजार रुपये किमतीचे महागडे लोखंडी पत्रे भरून पोबारा केला. असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. चाकण पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)