वासुली उपसरपंच कार्यालय हल्ल्याप्रकरणी आणखी दोघांना अटक

आजपर्यंत एकूण सातजण गजाआड
वाकी  -खेड तालुक्‍याच्या पश्‍चिम पट्ट्यातील वासुली (ता. खेड) गावच्या उपसरपंचांचे पुण्याई कॉम्प्लेक्‍समधील सायली ग्रुप या कार्यालयावर मागील आठवड्यात पाच दिवसांपूर्वी हल्ला केल्याप्रकरणी रविवारी (दि. 27) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास आणखी दोघांना अटक करण्यात आली. त्यामुळे आजअखेर एकूण सात जणांना गजाआड करण्यात आल्याची माहिती पोलीस पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव व ठाणे अंमलदार सुभाष पवार यांनी दिली.
रोहित अमित चव्हाण (रा. कातवी, ता. मावळ) व अभिषेक कृष्णा टाकळकर (रा. तळेगाव दाभाडे, ता. मावळ) अशी आज अटलठक करण्यत आलेल्यांची नावे आहेत. तर औद्योगिक भंगारमाल व्यावसायिक गुरूदास सदाशिव तेलंग (वय 26, मूळ रा. उस्मानाबाद; सध्या रा. इंदोरी, ता. मावळ), कर्मचारी राकेश वासुदेव येवले (वय 25, रा. कान्हेवाडी, ता. खेड), प्रथमेश बाळासाहेब दौंडकर (वय 21, रा. शेलपिंपळगाव, ता. खेड; सध्या रा. खराबवाडी), हिरामण दशरथ शेवकर (वय 28, रा. इंदोरी, ता. मावळ) व एक वेगवेगळ्या गंभीर गुन्ह्यातील अल्पवयीन सराईत गुन्हेगार अशा पाच जणांना शनिवारी (दि. 26) जेरबंद करण्यात आले होते. त्यामुळे आजअखेरपर्यंत अटक करण्यात आलेल्यांची एकूण संख्या सात झाली आहे.
याबाबत वृत्त असे की, धारदार हत्यारांसह आलेल्या आठ ते दहा जणांच्या टोळक्‍याने खेड तालुक्‍याच्या पश्‍चिम पट्ट्यातील वासुली (ता. खेड) गावचे उपसरपंच सुरेश श्रीपती पिंगळे (वय 35, मूळ रा. वासूली, भामचंद्रनगर, ता. खेड; सध्या रा. सह्याद्री सोसायटी, देहूगाव, ता. हवेली) यांचे पुण्याई कॉम्प्लेक्‍समधील सायली ग्रुप या व्यावसायिक कार्यालयावर पाच दिवसांपूर्वी मंगळवारी (दि. 22) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास आरोपींनी हल्ला केला होता. त्यात कार्यालयातील सामानाची व एका मोटारीसह दोन दुचाक्‍यांची मोडतोड करून अंदाजे पाच ते सहा लाख रुपयांचे नुकसान केले. तसेच मोबाईलवरुन उपसरपंच पिंगळे यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली. चाकण पोलिसांनी या प्रकरणी आजअखेर सात जणांना अटक केली आहे. मात्र, यातील फरारी झालेल्या अन्य काही हल्लेखोरांचा शोध सुरु आहे. दरम्यान, चाकण भागात औद्योगिक वर्चस्व व ठेकेदारीच्या वादातून हा वाद असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त होत आहे. पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रशांत पवार, प्रदीप पवार, व त्यांचे अन्य सहकारी याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)