वासंतिक पुष्पोत्सवात सजले “दगडूशेठ’ दत्तमंदिर

श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई ट्रस्ट दत्त मंदिरात वासंतिक पुष्पोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त दत्तगुरूंच्या मूर्ती आणि मंदिराला भव्य आरास करण्यात आली होती.

कै.श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे फुलांची आरास

पुणे- मोगऱ्याच्या लाखो फुलांनी सजलेला दत्तमंदिराचा परिसर…सुवासिक फुलांनी साकारलेला महाराजांचा मुकुट… रंगीबेरंगी फुलांची आकर्षक आभूषणे… शोभीवंत फुलांची आरास… आणि गुलाब, झेंडू, चाफा, लिलीसारख्या नानाविध फुलांनी सजलेल्या दत्तमंदिरात वासंतिक पुष्पोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी चैत्र अमावस्येला दत्तमहाराजांकरीता केलेली फुलांची आरास व महाराजांचे फुलांच्या दागिन्यांनी सजलेली मनोहारी रुप पाहण्याकरिता मोठया संख्येने भाविक उपस्थित होते.

-Ads-

कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे संस्थापिका लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई यांच्या पुण्यतिथीनिमित्त पुष्पोत्सवाचे आयोजन करण्यात आले. पुष्पोत्सवाबाबत माहिती देताना अध्यक्ष शिरीष मोहिते म्हणाले, सुमारे 55 हजार मोगरा, 20 हजार लिली, 15 हजार गुलाब, 150 किलो झेंडू, 2 हजार 500 चाफा, 2 हजार जाई, 2 हजार जुई आणि पासलीच्या पानांनी पुष्पोत्सवात सजावट करण्यात आली. सुभाष सरपाले आणि सहकाऱ्यांनी ही आरास साकारली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)