वाशेरे गावातील दोघी बहिणींचा बुडून मृत्यू

तळ्यातील पाण्यात कपडे धुण्यासाठी गेल्या असता बुडाल्या

राजगुरूनगर, दि.20 (प्रतिनिधी) – खेड तालुक्‍यातील वाशेरे गावात असलेल्या तळ्यातील पाण्यात कपडे धुण्यासाठी गेलेल्या दोघी बहिणींचा बुडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि. 19) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली. नीता अनिल कुडेकर (वय 18), रुचिता अनिल कुडेकर (वय 15)असे मृत्यू झालेल्या बहिणींची नावे आहेत.
याबाबत स्थानिक ग्रामस्थांनी दिलेली माहिती अशी की, बुधवारी (दि. 19) वाशेरे (ता. खेड) या गावाजवळ मर्सिडीज बेन्झ या कंपनीने बांधलेल्या तळ्यात कपडे धुण्यासाठी नीता कुडेकर आणि तिची बहीण रुचिता कुडेकरया दोघी गेल्या होत्या. नीता ही तळ्यातून पाणी काढत असताना तिचा पाय घसरला, यावेळी तिला वाचविण्यासाठी रुचिता गेली. मात्र, त्या दोघीही तळ्यातील पाण्यात पडल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला. यावेळी या दोघींचा लहान चुलत भाऊ तेथे होता. त्याने ही घटना पाहिल्यानंतर आरडाओरडा केला, तेव्हा स्थानिक ग्रामस्थांनी तळ्याकडे धाव घेत त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांचा मृत्यूमुळे वाशेरे गावावर शोककळा पसरली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)