वावरहिरेत पाणीप्रश्‍नी जनजागृती अभियान बैठक

बिजवडी – वीर संताजींनी मोघलांना सळो की पळो करून सोडले होते. त्यांच्या घोड्यांनाही पाणी पिताना पाण्यात संताजी दिसत होते.तसेच आपल्यालाही एकजूटीने हक्काचे पाणी मिळवण्यासाठी शासनाला सळो की पळो करून सोडावे लागणार आहे,असे प्रतिपादन महाराष्ट्र भटक्‍या विमुक्त जाती जमातीचे अध्यक्ष प्रा.धनंजय ओंबासे यांनी केले आहे.

वावरहिरे ता. माण येथे उत्तर माणच्या पाणीप्रश्‍नासंदर्भात जनजागृती अभियान दौऱ्याच्या बैठकीप्रसंगी ते बोलत होते.यावेळी कृष्णा खोरे विकास संघर्ष समितीचे अध्यक्ष डॉ.महादेव कापसे , महादेवशेठ देवकर, डॉ. उज्वलकुमार काळे आदी प्रमुख तसेच थदाळेचे सरपंच शरद बोराटे ,दानवलेवाडीचे सरपंच देवराज तरटे ,राजेंद्र कदम ,बबनराव खुस्पे आदी उपस्थित होते. प्रा.धनंजय ओंबासे म्हणाले ,उत्तर माणमधून पाच आमदार होऊन गेले. तरीही या भागाला पाणी मिळाले नाही.

-Ads-

आम्हाला उरमोडी, जिहे-कटापूर, धोम-बलकवडी, सोळशी धरणाबरोबरच आणखी कोणत्याही धरणातून द्या पण पाणी द्या यासाठी आपण एक येणे गरजेचे आहे. पुन्हा एकदा हा लढा उभारण्यासाठीा आपण जनजागृती अभियान राबवले असून या उत्तर भागाला निश्‍चित पाणी मिळवून देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. महादेवशेठ देवकर म्हणाले,डॉ. महादेव कापसे कृष्णा खोरे संघर्ष समितीचे जनक आहेत. उत्तर माणच्या पाण्याचा प्रश्‍न सोडवण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे.ते जी दिशा ठरवतील त्यांच्या पाठीशी आपण सर्वांनी पाण्यासाठी एकजूटीने राहण्याची गरज आहे. डॉ. उज्वलकुमार काळ, यावेळी सरपंच देवराज तरटे ,राजेंद्र कदम यांनीही मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन सुधीर जाधव तर आभार राजेंद्र कदम यांनी मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)