वाळू वाहतूक करणाऱ्या दोन डंपरवर कारवाई

रहिमतपुर – गुरवारी दुपारी रहिमतपुर ते ब्रम्हपुरी रोडने वाळुची अवैध वाहतूक करणाऱ्या दोन डंपरवर कारवाई करण्यात आली. पोलिसांनी डंपरवर, वाळूसह सुमारे लाख हजारांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. पोलिसांनी केलेल्या या धडक कार्यवाही मुळे अवैध रीत्या वाळू वाहतूक करणार्यांचे धाबे दणाणले आहेत.

पोलिसांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार कोरेगाव उपविभागीय अधिकारी प्रेरणा कट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार कुंभार, पो.ना.पी.एम भोये, एस. सी. जाधव यांच्या पथकाने गुरवारी दुपारी ब्रह्मपुरीकडुन रहिमतपुरकडे येत असलेल्या दोन डंपरवर छापा टाकून 20 लाख 40 हजारांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. यावेळी डंपर क्रमांक एमएच 11 बीएल 777 आणि एमएच 11 बीके 922 या डंपर चालकांकडे बनावट पावती आढळून आली. चालक गणेश अनिल जांभळे, मालक विक्रम पोपट जाधव रा. कोडोली रा. शाहूपुरी सातारा व संकेत सुभाष माने रा. मोरगल्ली रहिमतपुर मालक शंकर बाळासाहेब बर्गे रा. कोरेगाव, लीलावधारक सुंदर कल्याण घाडगे रा. कामेरी ता.जि.सातारा यांच्यावर ही कारवाई करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)