वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरने तिघांना चिरडले

पारनेर: तालुक्‍यातील खडकवाडीपासून काही अंतरावरील पळशी रस्त्यावर अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरने मोटरसायकलवरील तिघांना चिरडल्याने एका जणासह दोन महिला जागीच ठार झाल्या. सायंकाळी पाचच्या सुमारास हा अपघात झाला.

मोटारसायकलवरून क्रमांक (एमएच. 16 वाय 1914) गोरक्ष कोंडीभाऊ मेंगाळ (वय 40) बुधाबाई कोंडीभाऊ मेंगाळ (वय 68 दोघेही रा. नागापूरवाडी ता.पारनेर) सुमन पंढरीनाथ डेंबे (वय 75 रा.वनकुटे ता.पारनेर) हे तिघांना जात असतांना भरधाव वेगाने येणाऱ्या वाळूच्या डंपरने या तिघांना मोटारसायकलसह चिरडल्याने ते जागीच ठार झाले. अपघातनंतर डंपर चालक व सहायक फरार झाला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अपघातानंतर डंपरखाली चिरडलेल्या तिघांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतू डॉक्‍टरकांनी त्यांना मृत घोषित केले. या परिसरामध्ये अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांची संख्या मोठी आहे. दिवसरात्र हे वाहन या रस्त्यांनी वाहतूक करीत असतात. प्रशासनाचा देखील यावर कुठल्याही प्रकारचे नियंत्रणात राहिलेला नाही. त्यामुळे भरधाव वेगाने ही वाहने धावत असतात व अनेक जणांना यांच्यामुळे प्राण गमवावे लागले आहेत.

ही घटना घडल्यानंतर देखील प्रशासनाला जाग आली नसून रात्री उशिरापर्यंत प्रशासनाचा कुठलाही अधिकारी या ठिकाणी पोहोचला नव्हता. त्यामुळे येथील ग्रामस्थ संतप्त व आक्रमक झाले होते. जोपर्यंत डंपरचा शोध लागत नाही व आरोपीला अटक नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे. त्यामुळे मृतदेह जाग्यावर होते. पारनेरचे पोलीसपथक घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास करण्यात येत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)