वाळू उपशाच्या ठेक्‍यावरुन खडाजंगी

म्हसवड पालिका सभा : विरोधी गटातील नगरसेवकांमध्येच जुंपली
म्हसवड, दि. 27 (प्रतिनिधी) – नदी पुनर्जिवीत करण्यासाठी महाराष्ट्र व केंद्र सरकार करोडो रूपये खर्च करत असून गत तीन वर्षापूर्वी माणगंगा नदीमधील झाडे झुडपे काढून नदी पात्रातील डबरी खड्डे मुजवण्यासाठी पालिकेने हजारो रूपये खर्च केले होते. त्यानंतर सत्तेवर आलेल्या सत्ताधारी गटाने व विरोधी गटातील एका नगरसेवकाने सत्ताधारी गटातील नगराध्यक्ष व इतर दोन नगरसेवकांना हताशी धरून पालिका सभागृहात मिंटीगमध्ये नामंजुर झालेला वाळू उपसाचा बेकायदेशीर मंजुर केलेला ठराव आज झालेल्या सभेत ठरवून पुन्हा या विषयाला स्थगिती देत जिल्हाधिकारी याना सर्व नगरसेवक भेटू ठराव रद्द करण्याचे आवहान करण्यात येणार असल्याचा विषय घेण्यात आला. तर या सभेत विरोधी गटातील नगरसेवक अकिल काझी व विकास गोंजारी यांच्यात चांगलीच “तु तु मै मै’ झाल्याने गोंजारी याचा राजीनामा मागण्यापर्यत वादावादी झाल्याची चर्चा मात्र शहरात सुरू होती.
आज म्हसवड पालिकेची सर्वसाधारण सभा सकाळी दहा वाजता घेण्यात आली. या सभेचे अध्यक्ष नगराध्यक्ष तुषार विरकर होते. तर या सभेला प्रभारी मुख्याधिकारी म्हणून महादेव खांडेकर यानी काम पाहिले या सभे पुढे एकूण तेरा विषय ठेवण्यात आले होते. यापैकी मागील सभेचा विषयाचे वाचन करताच सर्व सत्ताधारी व विरोधी गटातील पाच नगरसेवकांनी पाठीमागील सभेत म्हसवड पालिका हद्दीतील नदी पाञातील वाळू उपसाच्या ठरावाला विरोध असताना ठराव ना मंजुर असताना ठरावाच्या रजिस्टरमध्ये खाडाखोड करून वाळू लिलावाचा ठराव मंजुर असल्याचे पालिका लेटर पॅडवर सुचक म्हणुन अकिल काझी तर अनुमोदक म्हणून गणेश रसाळ यांनी व अध्यक्ष तुषार विरकर व मुख्याधिकारी पंडीत पाटिल यांच्या सह्या असलेले पञ जिल्हाधिकारी यांना देवून नदी पाञातील वाळूचे ठेके देवून माण गंगानदीचे वाटोळे कराय निघालेल्या सर्वाची चौकशी करावी हि मागणी करून वाळूचा दिलेला ठेका रद्द करण्याचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्याचा ठराव मंजुर करण्यात आला या विषयाच्या ठरावा वेळी विरोधी गटाचे नगरसेवक काझी व गोंजारी यांच्यात चांगलीच जुपली होती. यावेळी काझी म्हणाले, विकास तुला काय कळत नाही तु गप्प बस म्हणताच रणजित येवगे डॉ. मासाळ यानी काझी यांच्यावर तोंडसुख घेत तुम्हाला जास्त कळते म्हणून तर चार ना मंजुर ठराव आम्हाला फसवून नेत्याचे नाव सांगून विरोधकांशी हात मिळवणी करून सत्ताधारी गटाला मदत करता, हे पक्ष विरोधी नाही का? असा एक ना अनेक कारणे करून काझी यांची बोलती बंद केली. या सभेत सौर ऊर्जा प्रकल्प विरकरवाडीसह पालिका हद्दीतील सर्व शाळांमध्ये राबवण्याचा अंपग व्यक्तीना3 टक्के निधी ऐवजी 5 टक्के निधी त्यांच्या खात्यावर थेट जमा करणे, आदी एकूण तेरा विषय मंजुर करण्यात आले. यावेळी सर्व नगरसेवक उपस्थित होते.

चौकट
सभागृहातील वादावादीनंतर बाहेर पडताच काझी यांनी स्वीकृत नगरसेवक गोंजारी यांना आमदार जयकुमार गोरे यांनी तुम्हाला राजीनामा देण्यास सांगितले आहे असे सांगितले. त्यावर संतापलेल्या गोंजारी यांनी काझी यांना चांगलेच फैलावर घेत हे पद माझे नेते विजयसिंह व नितीन दोशी यांनी मला दिले आहे तू मला सांगू नकोस अशा शब्दात चांगलेच फटकारले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)