वाळूतस्करांची तहसीलदारांना धक्काबुक्कीकरत दमदाटी

संगमनेर – विनापरवाना वाळू वाहतूक रोखण्यासाठी गेलेले संगमनेरचे तहसीलदार साहेबराव सोनावणे यांच्यासह त्यांच्या पथकातील कर्मचाऱ्यांना वाळूतस्करांनी धक्काबुक्की करून धमकावले. मांडवे बु. परिसरातील मुळा नदीपात्रात मंगळवारी (दि.23) सकाळी ही घटना घडली. याप्रकणी घारगाव पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, मांडवे बु. व देसवडे (ता. पारनेर) हद्दीत मुळा नदीपात्रामध्ये अनधिकृत वाळू वाहतूक सुरू असल्याची माहिती खबऱ्याकडून तहसीलदार सोनावणे यांना मिळाली. त्यांनी त्यानंतर त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह दुचाकीवरून सकाळी 7.30 वाजता मुळा नदीपात्र गाठले. संगमनेर तालुक्‍यातील मांडवे बु. हद्दीत दोन विना क्रमांक लाल रंगाचे ट्रॅक्‍टर ट्रेलरसह अनधिकृत वाळू उपसा करताना पथकाच्या निदर्शनास आले. वाहन अडवण्याचा प्रयत्न पथकाने केला असता, वाळू तस्करांनी ट्रॅक्‍टर पारनेर हद्दीतील देसवडे येथे नेऊन लपविली. चौकशीदरम्यान ही वाहने प्रवीण नवनाथ भोर व अजित भिका भोर (दोघेही रा. देसवडे, ता. पारनेर) यांची असल्याचे समजले. ट्रॅक्‍टरचा पाठलाग गेला असता चालकांनी पथकाशी धक्काबुक्की करत वादावादी केली. या प्रकरणी मांडवे बु.चे तलाठी गणेश अरुण शिंदे यांनी घारगाव पोलीस ठाण्यात प्रवीण नवनाथ भोर व अजित भिका भोर यांच्या विरुद्ध शासकीय कामात अडथळा, दमदाटी, जमाव गोळा करणे, गोंधळ घालणे, शासकीय मालमत्तेची चोरी करणे, जप्त वाहन पळवून नेणे, चोरटी गौणखनिजाची वाहतूक करणे, याप्रकरणी गुन्हा दाखल केला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)