तहसीलदार महेंद्र माळी यांची माहिती : श्रीगोंदे तालुक्‍यात अवैध वाळूतस्करीविरुद्ध कारवाई
श्रीगोंदे – तहसीलदार महेंद्र माळी व त्यांच्या पथकाने मागील आठवड्यात अवैध वाळूविरुद्ध कारवाई करीत 6 लाख 35 हजार 200 रुपयांचा महसूल वसूल केल्याची माहिती तहसीलदार महेंद्र माळी यांनी दिली.
तहसीलदार माळी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, त्यांच्या पथकाने मागील आठवड्यात आर्वी, पेडगाव, खरातवाडी आणि बेलवंडी बु. या परिसरात अवैध वाळूतस्करीविरुद्ध कारवाई केली. यामध्ये विनापरवाना वाळूवाहतूक करणाऱ्या चार ट्रक ताब्यात घेण्यात आल्या आहेत. प्रत्येक ट्रकला 1 लाख 50 हजार 800 रुपयांचा दंड करण्यात आला आहे. चार वाहनांना केलेल्या या दंडातून 6 लाख 3 हजार 200 रुपयांचा महसूल वसूल करण्यात आला आहे. त्याचबरोबर पेडगाव येथील अवैध वाळूसाठा जप्त करून त्याच्या लिलावातून 31 हजारांचा महसूल वसूल करण्यात आला आहे. त्याचबरोबर अन्य 3 वाहनांवर 353, 379 प्रमाणे गुन्हे दाखल केल्याचे तहसीलदार महेंद्र माळी यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)