वाळूउपसा प्रकरणी 64 लाखांचा मुद्देमाल नष्ट

श्रीगोंदा – श्रीगोंदा आणि दौंड महसूल प्रशासनाच्या संयुक्त पथकाने भीमा पट्ट्यातील श्रीगोंदा तालुक्‍यातील आर्वी, अनगरे व दौंड तालुक्‍यातील देऊळगाव राजे, आलेगाव या ठिकाणी कारवाई करून 64 लाखांचा मुद्देमाल नष्ट केला.

मंगळवारी करण्यात आलेल्या या कारवाईत श्रीगोंदा तहसीलदार महेंद्र माळी, दौंड तहसीलदार बालाजी सोमवंशी यांच्या संयुक्त पथकाने आलेगाव, आर्वी, अनगरे, देऊळगाव राजे परिसरात अवैध वाळू उत्खनन करणाऱ्या 15 फायबर आणि 1 सक्‍शन बोट अशा एकूण 16 बोटी नष्ट केल्या आहेत. ही कारवाई श्रीगोंदा तहसीलदार महेंद्र महाजन आणि दौंड तहसीलदार बालाजी सोमवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत मंडल अधिकारी वाघमारे, लिपिक गोरे, संजय स्वामी, भानुदास येडे, तलाठी सुनील जाधव, हरिश्‍चंद्र फरांदे यांनी सहभाग घेतला होता. एकूण 64 लाखांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)