वाळुची अवैध वाहतूक, 3 लाखांच मुद्देमाल जप्त

मायणी, दि. 10 (प्रतिनिधी) – चितळी, ता. खटाव येथील येरळा नदी पात्रात वाळुचे अवैध उत्खनन करून पळून जाणारे वाहन पकडून 3 लाख 3 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल दक्षता कमिटी व ग्रामस्थांच्या सहकार्याने मायणी पोलिसांनी जप्त केला.
याबाबत अधिक माहिती, चितळी, ता. खटाव येथील येरळा नदीत मध्यरात्री दीडच्या सुमारास अवैध उत्खनन करून वाळूची चोरटी वाहतूक सुरू होती. चितळी येथील दक्षता कमिटीला माहिती खबऱ्याकडून मिळाली. त्यावेळी दक्षिता कमिटीतील सदस्य नदीपात्राकडे गेले असता संशयीत वाहन नदीपात्रातून बाहेर येत होते. कमिटीचे सदस्य दिसताच वाहनाचा चालक सागर शिवाजी मदने वाळूने भरलेले वाहन तेथेच सोडून पसार झाल. दरम्यान, गस्त घालत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष गोसावी यांना दूरध्वनी करून याची माहिती दिली त्यानंतर पोलीस कर्मचारी यांनी 3 लाख 3 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तपास हेड कॉन्स्टेबल सुरेश हंगे करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)