वाळुंजमळ्यात चोरी, लाखाचा ऐवज नेला

मंचर-जवळे (वाळुंजमळा, ता. आंबेगाव) येथे गुरुवारी (दि. 25) पहाटे चारच्या सुमारास मधुकर सोपान बोऱ्हाटे यांच्या घरी चोरी झाली असून त्यांची पत्नी सुंदराबाई मधुकर बोऱ्हाटे यांच्या गळ्यातील, एक लहान, व एक मोठे मंगळसूत्र व कपाटातील 35 हजार रुपये रोख रक्कम असे एकूण 1 लाख रुपयांची चोरी झाली आहे.
वाळुंजमळा येथे राहणाऱ्या सुंदराबाई मधुकर बोऱ्हाटे यांना काल सांयकाळी साडेसहाच्या सुमारास दोन अज्ञात युवकांनी गाडीवर लिफ्ट देत घरी सोडले होते. घरी आल्यावर या युवकांना घरात घेत सुंदराबाई यांनी त्यांना चहा दिला होता. याच युवकांनी पाळत राखून ही चोरी केली असल्याचे सुंदराबाई यांनी सांगितले. जवळे व परिसरात रात्रीच्या वेळी पोलीस पाटील उत्तम शिंदे व ग्रामसुरक्षा दलातील, निरंजन शिंदे, अभिजित शिंदे, पंढरी टाव्हरे, दिनकर शिंदे, अनिल शिंदे, सागर शिंदे हे गस्त घालत होते. 4 वाजता गस्त संपवून ते घरी आले असता वाळुंजमळा येथे ही चोरी झाली. चोरट्यांनी बोऱ्हाटे यांच्या घराची कडी उचकटून घरात प्रवेश करत चाकूचा धाक दाखवत गळ्यातील लहान, मोठे दोन मंगळसूत्र हिसकावून घेतली. तसेच कपाटातील 35 हजार रोख रक्कम चोरून नेली. घडलेली घटना कळताच मंचर पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अर्जुन शिंदे, बिट अंमलदार सागर गायकवाड व जवळे पोलीस पाटील उत्तम शिंदे यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली याबाबत मधुकर सोपान बोऱ्हाटे, सुंदराबाई मधुकर बोऱ्हाटे यांनी अज्ञात चोरट्याविरोधात फिर्याद दिली असून पुढील तपास मंचर पोलीस करीत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)