वाळवलेल्या फुलांना निर्यातीची संधी

आंतरराष्ट्रीय आणि भारतीय दोन्ही बाजारांत सुक्‍या फुलांना फार मागणी आहे. भारतामधून ही फुले यूएसए, जापान आणि यूरोपला निर्यात केली जातात. भारतामध्ये फुलांचे विविध प्रकार असल्यामुळे या व्यापारात तो प्रथम स्थानी आहे. नुसतीच सुकी फुले नाही तर त्यांचे देठ, सुकलेले कोंब, बिया, देठांची साले इ. देखील निर्यात होते.

भारतातून अशी निर्यात सुमारे 100 कोटीं रुपयांची होते. या उद्योगातून 20 देशांत 500 प्रकारच्या फुलांचे प्रकार पाठवले जातात. यांपासून हातकागद, लॅंपशेड, कॅंडल होल्डर, जूटच्या पिशव्या, फोटो फ्रेम, बॉक्‍स, पुस्तके, वॉल हॅंगिग, टॉपियरी, कार्डे आणि कितीतरी वस्तू बनतात. या वस्तूंसाठी सुक्‍या फुलांचा उपयोग केल्यामुळे त्यांची शोभा आणखी वाढते आणि त्या वस्तू छान दिसतात.इंग्लंड हा आपला मोठा ग्राहक देश आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सुकी फुले बनविण्याची दोन पध्दती
फुलशेती करणे ,फुले वाळविणे,अवश्‍यकता भासल्यास पुन्हा रंगविणे आदी प्रक्रियांना या व्यवसायात विशेश महत्व आहे.
* फुले खुडण्यासाठी आणि वाळविण्यासाठी उत्तम काळ : फुले सकाळच्या वेळी जेव्हां त्यांच्यावरील दंव उडून जाते तेव्हां खुडावीत. एकदा खुडल्यावर, देठ एकत्र करून त्यांना रबर बॅंडने बांधा आणि शक्‍यतो लवकर उन्हातून बाजूला करा.

* उन्हांत वाळवणे: उन्हांत वाळविणे हा सर्वात सोपा आणि स्वस्त उपाय आहे. पण पावसाळ्यात हे शक्‍य नसते. फुलांचे गुच्छ दोरीने बांधून बांबूच्या काड्यांनी लोंबते ठेवतात. रसायनांचा वापर करीत नसतात. चांगले वायुवीजन मात्र हवे. या पध्दतीत बुरशी लागण्याचा फार धोका असतो.
* व्यावसायिक सुक्‍या फुलांचे उत्पादन फुले व वनस्पतींचे भाग ः कोंबड्याचा तुरा, जाई, अमरांथस, ऍरेका आणि नारळाची पाने आणि खुडलेली फुले या वर्गात येतात. सुकी पाने व कोंब देखील वापरतात. गेल्या 20 वर्षांपासून भारत या प्रकारची निर्यात करीत आहे.

* पॉटपाउरी: हे सुगंधी सैल अशा सुक्‍या फुलांचे मिश्रण आहे जे एका पॉलिथिनच्या पिशवीत ठेवतात. सामान्यपणे कपाटांत, ड्रॉवरमध्ये किवा बाथरूममध्ये ठेवतात. या पध्दतीत 300 पेक्षा जास्त प्रकारच्या फुलांचा समावेश आहे. बॅचलर्स बटन, कोंबड्याचा तुरा, जाई, गुलाबाच्या पाकळ्या, बोगनविलियाची फुले, कडुलिंबाची पाने, आणि फळांच्या बिया इ.चा उपयोग भारतात पॉटपाउरीसाठी करतात.आपला मुख्य ग्राहक इंग्लंड हा देश आहे.

* सुक्‍या फुलाचा पॉट:  सुक्‍या फुलांच्या फुलदाण्यांना विशेश मागणी असून त्याकरिता सुके देठ आणि कोंब वापरतात. याची मागणी कमी असली तरी उच्च उत्पन्न वर्गातून याचा वापर आहे व पैसेही जास्त मिळतात. साधारणपणे वापरात येणारे पदार्थ आहेत कापसाच्या वाळलेल्या बिया, पाइनची फुले, सुक्‍या मिरच्या, सुका दुधी भोपळा, गवत, जाईचे रोपटे, एव्हरलास्टींग फुले, अस्पॅरॅगसची पाने, फर्नची पाने, झाडांच्या साली आणि तुरे.
* सुक्‍या फुलांची हस्तकला ः सुक्‍या फुलांच्या बाजांरातील अलिकडचा विकास. सुक्‍या फुलांच्या तसबिरी, ग्रीटिंग कार्डे, बुके, कॅंडल स्टॅण्ड, काचेचे बाउल यांचा वापर या फुलांच्या रचना करण्यासाठी वापरतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)