वाळवंटामधले ‘कूल होम’

कोणतीही वस्तू टाकाऊ नसते. जर तुमच्याकडे तितकी कल्पकता असेल तर टाकाऊ समजल्या जाणाऱ्या वस्तूंपासूनही एखादी सुंदर वस्तु बनवू शकते. लंडनमधील एक डिझायनर जेम्स व्हिटकर हा असाच एक कल्पक माणूस आहे. त्याने बेकार पडलेल्या काही कंटेनरचा कल्पकतेने उपयोग करून वाळवंटात एक सुंदर घर बनवले आहे. या घरात एखाद्या सुसज्ज, आधुनिक घरातील सर्व सोयी आणि सौंदर्य आहे.

जेम्सने सांगितले, मी या वर्षाच्या सुरूवातीला माझ्याकडे एका ग्राहकाने वाळवंटातील आपल्या प्लॉटमध्ये घर बनवण्यास सांगितले. कॅलिफोर्नियाच्या उष्ण वाळवंटाच्या मध्यभागी ही जागा होती. 90 एकरच्या या प्लॉटमध्ये मी एक घर डिझाईन केले व त्याला “द जोशुआ ट्री रेसिडन्स’ असे नाव दिले. वाळवंटात कंटेनरमध्ये राहण्याची कल्पनाच एखाद्याला घाम फोडणारी असु शकते, पण हे घर थंड आणि वातानुकूलित आहे. त्याच्या खिडक्‍यांमधून वाळवंटही सुंदर दिसते हे विशेष!


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)