वाल्ह्यात दोन दिवसांत आठ ठिकाणी घरफोडी

वाल्हे- दोन दिवसांत वाल्हे गावात आठ ठिकाणी घरफोडीची घटना घडल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे नागरिकांना रात्रीची गस्त वाढविण्याची मागणी केली आहे.
चोरट्यांनी सोमवारी सावतामाळी चौक ते कुंभार आळीतील तीन घरे फोडली. मंगळवारी पहाटे वाल्हे जिल्हा बॅंक जवळील पोस्ट गल्लीत बाबू पानसांडे व त्यांच्या घराजवळील तीन घरे फोडली. यानंतर चोरट्यांनी पवार आळीतील उमेश उदयसिंग पवार यांच्या घरातील तीन तोळ्याची सोन्याचे गंठण, दोन अंगठ्या, कानातील फुलजोडी आदी दागिने लंपास केला. तसेच सुधाकर पवार यांच्या घराची कडी उचकटून कपडे चोरले. या प्रकरणी उमेश पवार यांनी वाल्हा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पुढील तपास सहाय्यक पोलीसस उपनिरीक्षक श्रीरंग निगडे करीत आहेत. वाल्हे पोलीस ठाण्यात कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. तरी ग्रामपंचायत पातळीवर ग्रामरक्षक दलाने सहकार्य करण्याबरोबरच गावात सीसीटीव्ही बसविण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)