वाल्हे- वाल्हे (ता. पुरंदर) येथील शाही सुन्नी मशीदमध्ये मुस्लीम बांधवांनी सामुहिकरीत्या नमाज पठण करून बकरी ईद उत्साहात साजरी केली. यावेळी मुस्लीम बांधवांनी सकाळच्या प्रहरी वरुणराजाच्या हजेरीत देखील स्वच्छ झगझगीत कपडे आणि कलाकुसर केलेल्या टोप्या परिधान करून नमाज पठणासाठी शाही सुन्नी मशीदमध्ये गर्दी केली होती. या दरम्यान नमाज पठणासाठी वाल्हेसह मांडकी, दौंडज, पिंगोरी आदी भागातून मुस्लीम बांधव आले होते. यावेळी मौलाना मोहम्मद इरफान यांनी सामुहिक नमाज पठण करून “कुराण’चे महत्त्व विषद केले.त्यानंतर मुस्लीम बांधवांनी एकमेकांची गळाभेट घेऊन आनंद व्यक्त केला,तर अनेकांनी मुस्लीम धर्मानुसार इतर गरजू व्यक्तींना आर्थिक मदत करून जकात देखील अदा केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)