वालचंदनगर परिसरात पोस्ट सेवा कोलमडली

निमसाखर – वालचंदनगर (ता. इंदापूर) पोस्ट कार्यालयांतर्गत येणाऱ्या सुमारे नऊ शाखेतील (ग्रामीण) कर्मचारी अखिल भारतीय ग्रामीण डाक सेवक युनियनने पुकारलेल्या बेमुदत संपात सहभागी झाले आहेत. या संपामुळे पोस्ट खात्या अंतर्गत येणाऱ्या बॅंकिंग सेवेबरोबरच टपाल सेवा ठप्प झाल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना अडचणींना समारे जावे लागत आहे. सातवे वेतन आयोग लागू करा, याचबरोबर खाते बाह्य कर्मचाऱ्यांना खात्यात समाविष्ट करा या सह अन्य विविध मागण्यांसाठी बेमुदत संप पुकारण्यात आला. या शाखा कार्यालयांच्या माध्यामातून सेव्हिंग खाते, आरडी, मुदत ठेव योजना, बॅंकिंग व्यवहार, साधी, स्पीड पोस्ट, रजिस्टर, व्ही.पी. पार्सल आदी पत्र व्यवहार यासह अन्य कामे या कार्यालयांतर्गत केली जातात. सध्या सुरु असलेल्या संपात वालचंदनगर उपडाक घर अंतर्गत येणारे निमसाखर, लासुर्णे, अंथूर्णे, रणगाव, शिरसटवाडी, कळंब, निरवांगी, खोरोची व रेडणी अशी नऊ गावातील कर्मचारी सहभागी झाले आहेत. यावेळी धनंजय सूर्यवंशी, संजय जठार, मारुती घाडगे, सोमनाथ रासकर, ऋक्षीकेश पवार, बाळासाहेब ढोपे, दिलीप गायकवाड, रुपाली निकम, अश्‍विनी दहीदुले, नवनाथ क्षीरसागर, युवराज गायकवाड, उत्तम कदम यासह अन्य कर्मचारी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)