वालचंदनगर-जंक्‍शन मार्ग रोखला

निमसाखर – महागाईच्या भडक्‍याने सर्व सामान्य जनता त्रस्त असताना त्यांना दिलासा देण्याऐवजी रोज नियमितपणे इंधन दरवाढ सुरू आहे. याचा निषेध नोंदविण्यासाठी वालचंदनगर (ता. इंदापूर) येथे आज (सोमवारी) सकाळी वालचंदनगर-जंक्‍शन रस्त्यावर विरोधी पक्षांनी रास्तारोको आंदोलन केले. यावेळी विविध पक्षाच्या मान्यवरांनी रास्तारोको दरम्यान सरकार विरोधी परखड मते व्यक्‍त केली. तसेच विविध मागण्यांचे निवेदन वालचंदनगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी एम. जी. फाळके, शिवाजी सातव यांनी स्वीकारले. यावेळी राष्ट्रवादीचे नवनाथ धांडोरे, अंकुश रणमोडे, इक्‍बाल शेख, संतोष रणमोडे, कॉंग्रेसचे सत्यशील पाटील, विजय पाटील, श्रीनिवास पाटील, कुलदीप रकटे, मनसेचे संतोष भिसेसह नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)