वालचंदनगर उपडाकघरची सहायक अधीक्षकांकडून पाहणी

निमसाखर- वालचंदनगर (ता. इंदापूर) येथील उप डाकघराला बारामतीचे डाकघर सहायक अधीक्षक एच. एस. आगवणे यांनी भेट देऊन स्वच्छतेबाबत कार्यालय व परिसराची पाहणी केली. दरम्यान, कार्यालय व परिसरात स्वच्छता, टापटीपपणा आढळल्याने त्यांनी समाधान व्यक्‍त केले. पोस्ट खात्याचे वालचंदनगर उप डाक घर आहे. या पोस्ट कार्यालयाअंतर्गत दहा शाखा डाक कार्यालये आहेत. आगवणे यांनी या कार्यालयाला भेट देऊन अचानक पाहणी केली. यावेळी मेलवर्षर डाक आवेक्षक एम. आर. लोणकर, एस. पी. एम. माधवी पाटील, एम. टी. एस. वाघ उपस्थित होते. दरम्यान, खातेदाराशी सुसंवाद ठेवत स्वच्छतेची पाहणी केली. आगवणे म्हणाले की, पोस्ट कार्यालयावर ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांचा आजही विश्वास आहे. पोस्ट खात्यात बद्‌ल होत असून कोअर बॅंकींगसारखी सेवा सुरु होत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
5 :thumbsup: Thumbs up
1 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)