वालंदनगर येथे नेत्र तपासणी शिबिर

कुरवली – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 127 व्या जयंतीचे औचित्य साधुन वालचंदनगर येथे नेत्र तपासणी शिबिर, मोफत चष्मे वाटप, गरजु महिलांना साडी वाटपाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी जिल्हा परिषदचे माजी सदस्य प्रताप पाटील यांच्या हस्ते गरजूंना साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी नवनाथ सूर्यवंशी, नवनाथ धांडोरे आदी उपस्थित होते. यावेळी 160 चष्मे, व 75 साड्यांचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी कळंबच्या सरपंच उज्वला फडतरे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष तुषार घाडगे, फुले-शाहु-आंबेडकर चळवळीचे ज्येष्ठ नेते एम. बी. मिसाळ, कळंब ग्रामशिक्षण संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र कदम, मनसेचे तालुकाध्यक्ष संतोष भिसे, भारत रणमोडे, लता उबाळे, कालिदास राऊत, मधुकर डोंबाळे आदी मान्यवर उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)