वारूळवाडी ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड

नारायणगाव- ग्रामपंचायत वारूळवाडीच्या वतीने दीपावलीनिमित्त सर्व कर्मचाऱ्यांना एक महिन्याच्या पगाराइतका बोनस, मिठाई, कपडे आणि इस्त्री वाटप करून कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड केली., अशी माहिती सरपंच ज्योत्स्ना फुलसुंदर आणि उपसरपंच सचिन वारुळे यांनी दिली. आयएससो पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतीने विकासाच्या कामात कायमच पुढाकार घेतलेला आहे. या बाबतीत ग्रामपंचायतीचे सरपंच ज्योत्स्ना फुलसुंदर आणि उपसरपंच सचिन वारुळे म्हणाले की, दुष्काळ सदृश स्थिती असताना सर्वसामन्य जनतेच्या सहकार्याने पुढील विकास करण्यामध्ये आम्ही कटिबद्ध राहू. विकासाच्या कामात ग्रामपंचायत कामगारांचाच सर्वांत मोठा वाटा असतो. म्हणूनच त्यांना दिवाळीच्या निमित्ताने बोनस आणि मिठाई वाटप करण्यात आले आहे. यावेळी संजय वारूळे, आशिष फुलसुंदर, जालिंदर कोल्हे, एम.डी. भुजबळ, ग्रामविकास अधिकारी व्ही. व्ही. मुळूक, ग्रामपंचायत सदस्य विपुल फुलसुंदर आदींसह इतर मान्यवर उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)