वारीतील थर्माकोल​चे वाढते प्रमाण रोखण्याची कचरावेचकांची मागणी 

पुणे :  वारीतील वापरण्यात आलेल्या थर्माकोल थाळ्या​ कचरावेचकांकडून आज गोळा करण्यात आल्या. या वेळी​ महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळा​चे दत्तात्रय साळुंखे, ‘एन्व्हरमेंट क्लब ऑफ इंडिया’ चे दत्तात्रय देवळे, पुणे मनपा चे सुरेश जगताप, अनंत शेडगे, प्रियांजली पवार, आप्पासाहेब सातपुते, अनिल मिसाळ, प्रकाश म्हस्के, महादेव कसबे, बबलू शिंदे, कचरा वेचक कविता डोलारे, स्वाती ओव्हाळ उपस्थित होते.  वारीतील वाढत्या थर्माकोलच्या वापरावर बंदी आणावी, अशी​ मागणी करणारे​​ निवेदन पुणे महानगरपालिकाचे आयुक्त यांना सादर करण्यात आले.

वारीतील वारकऱ्यांना देण्यात येणाऱ्या जेवणाकरीता थर्माकोल थाळ्यांचा वापराचे प्रमाण वाढत आहे. या थर्माकोल थाळ्या उचलल्या जाण्याची शक्यता कमी असल्याने, त्या पालिकेद्वारे कचऱ्याबरोबर उचलल्या जातात. त्यामुळे त्याच्यावर जागेवर प्रक्रिया होऊन पुनर्वापर होणे कठीण होते. इतर कचऱ्याबरोबर त्या जाळल्याचा प्रकार होतो. तसेच थर्माकोल मध्ये गरम पदार्थ टाकल्यावर खाणाऱ्या बरोबर निसर्गाच्या देखील आरोग्याला हानिकारक असते. थर्माकोलची विल्हेवाट लावण्याचा खर्च हा थर्माकोल थाळीच्या किंमतीपेक्षा कित्येक पटीने जास्त आहे. तो भार समाजाला उचलावा लागतो. तरी कचऱ्यात अशा प्रकारे पर्यावरणाच्या आरोग्याला धोका निर्माण करणाऱ्या थर्माकोल वर कायदेशीर बंदी आणावी. अशी आम्ही मागणी करत आहोत. या बंदीमुळे आरोग्य, नैसर्गिक व नैतिक हानी होणार नाही. याकरिता पुणे महानगरपालिकेच्या वतीने एक ठराव करण्यात यावा​, अशी मागणी सदर निवेदनात करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)