वाराणसी दौऱ्यात राष्ट्रपती कोविंद यांनी केले विकासाचे कौतुक

वाराणसी : वाराणसीमध्ये होणाऱ्या विकासकामांमुळे नागरिकांचे जीनवमान सुसह्य होत आहे, असे प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केले. उत्तर प्रदेश सरकारच्या विविध विकासकामांचा शुभारंभ रामनाथ कोविंद यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते.

राष्ट्रपती म्हणाले, आतापर्यंत स्पिरिच्युअल सिटी असलेली वाराणसी आता स्मार्ट सिटी बनत आहे. काशी विश्वनाथ यांच्या नगरीमध्ये राष्ट्रपती म्हणून येण्याची माझी ही पहिलीच वेळ. हा अनुभव माझ्यासाठी नक्कीच अविस्मरणीय आहे.

वाराणसीने यापूर्वी राज्याला अनेक मुख्यमंत्री दिले मात्र वाराणसीचा खासदार प्रथमच देशाचा पंतप्रधान झाला आहे आणि वाराणसीच्या लोकांसाठी गौरवाची बाब आहे असे सांगत कोविंद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गौरव केला. खासदार म्हणूनही नरेंद्र मोदी वाराणसीचा विकास व्हावा यासाठी प्रयत्नशील असतात असे कोविंद म्हणाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)