वारसुळा वस्ती येथील गणपती मंदिरातून दानपेटी चोरी

मंचर- अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) येथील वारसुळा वस्ती येथील गणपती मंदिरात अज्ञात चोरटयांनी चोरी करून मंदिरातील चांदीची मुर्ती आणि इतर अलंकार चोरून नेल्याची घटना शुक्रवारी पहाटे घडली. या प्रकरणी मंचर पोलीसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे.
वारसुळा वस्तीत गणपती मंदिर आहे. पहाटे पुजारी विलास भिकाजी शिंदे हे पूजेसाठी मंदिरात जात असताना मंदिराच्या सभागृहाला असणाऱ्या लोखंडी ग्रीलच्या गेटला लावलेले कुलूप तोडलेले दिसून आले. तसेच मंदिराच्या मुख्य गाभाऱ्याला असणारा कडी कोयंडा तोडून चोरटयांनी गाभाऱ्यातील चांदीची छत्री, चांदीचा मुखवटा, गणपतीची सव्वा किलो वजनाची चांदीची मुर्ती, दानपेटी चोरून नेली आहे. सुमारे 62 हजार रूपयांची चोरी झाल्याची फिर्याद संतोष पंढरीनाथ शिंदे यांनी मंचर पोलीस ठाण्यात दिली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)