वारणानगर येथे अपघातात दोघे गंभीर जखमी

कोल्हापूर – वारणानगर ता.पन्हाळा येथील वाठार रत्नागिरी हायवे वरील गॅलेकसी हॉस्पिटल समोर आज दोन वाजण्याच्या सुमारास झालेल्या महिंद्रा पिकअप गाडी क्रमांक MH10AQ5645 आणि मस्ट्रो स्कुटी मोटार सायकल क्रमांक MH09ED8251 अपघातात वारणा महाविद्यालयाचे प्राध्यापक दिलीपकुमार नानासाहेब भोसले वय ५८ राहणार वारणानगर व शिपाई सतीश शामराव मांगले वय ४२ राहणार निगवे हे गंभीर जखमी झाले आहेत.

महिंद्रा पिकअप वारणा नगरच्या दिशेने जात होती तर भोसले आणि मांगले हे रास्ता क्रॉस करत होते.रास्ता क्रॉस करत असताना महिंद्रा पिकअपच्या अचानक आडवे आल्याने पिकअपची मोटार सायकलला जोराची धडक बसून हा अपघात झाला.दोघाना उपचारासाठी वारणानगर येथील खाजगी हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे तर मांगले यांची प्रकृती गंभीर असल्याने त्याला कोल्हापूर येथे उपचारासाठी पाठविण्यात आले आहे.याबाबत अधिक तपास कोडोली पोलीस ठाणे करत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)