वारजे, बालेवाडी परिसरात गुरूवारी पाणीपुरवठा बंद

पुणे – वारजे जलशुद्धीकरण केंद्र ते गांधीभवन टाकी तसेच चांदणी चौक टाकी यांना पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीची दुरुस्ती करायची असल्याने या अंतर्गत येणारा पाणीपुरवठा गुरूवारी (27 डिसें.) रोजी बंद राहणार आहे. शुक्रवारी (28 डिसें.) रोजी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होईल, असे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातर्फे कळवण्यात आले आहे.

पाणीपुरवठा बंद राहणारा भाग – बाणेर, बालेवाडी, पाषाण परिसर, डावी-उजवी भुसारी कॉलनी, भूगाव, बावधन, परमहंसनगर, शास्त्रीनगर, लक्ष्मीनगर झोपडपट्टी, तेजसनगर, हिंगणे होम कॉलनी, काकडे सिटी, तिरुपती नगर स्वेदगंगा सोसायटी, गीतगंगा सोसायटी, समर्थ सोसायटी, गिरीश सोसायटी परिसर, मुंबई-पुणे बायपासच्या दोन्ही बाजू, रेणिकानगर, हिलव्ह्यू सोसायटी, सोबापूरम, सिप्ला फाउंडेशन, गार्डन सिटी, गार्डन फ्लोरा, बीएसयूपी सोसायटी, करण प्लाझा, आरएमडी कॉलेज परिसर, पॉप्युलर नगर, अतुलनगर, राहुल नगर, गोकुळनगर, वारजे माळवाडीचा परिसर, एनडीए रस्त्याकडील काही भाग, वाराणसी, व्हायला, मेघवर्षा, रामनगर पंपीग वरील काही परिसर या भागांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)