वारजेतील रामनगर पोलीस चौकीची सराईताकडून तोडफोड

घटनेने खळबळजनक


तक्रार नोंदवून घेण्यासाठी पोलीस नसल्याने केले हे कृत्य

पुणे- पोलीस चौकीत तक्रार नोंदवून घेण्यासाठी पोलीस नसल्याने चक्क चौकीच फोडल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी रात्री घडला. वारजे पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या रामनगर पोलीस चौकीत हा प्रकार घडला. दरम्यान या घटनेने पुणे शहरातील गुन्हेगारीने कळस गाठल्याचे बोलले जात आहे.
शहर गुन्हेगारीने बरबटल्याचे बोलले जात असताना त्यावर शिक्का मोर्तब झाला असून, एकीकडे सर्व सामन्यांच्या वाहनांची टोळक्‍याकडून तोडफोड केली जाता असताना दुसरीकडे पालीलस ठाणीही असुरक्षित असल्याचे चित्र बुधवारी रात्री रामनगर येथील चौकी फोडल्यानंतर निर्माण झाले आहे. वारजे माळवाडी भागात ही घटना घडली आहे. रामनगर परिसरात दोन गटामध्ये झालेल्या भांडणानंतर दोघे जण रात्री 9 वाजण्याच्या सुमारास मद्यधुंद अवस्थेत रामनगर पोलिस चौकीत तक्रार देण्यासाठी आले होते. त्यावेळी पोलीस कर्मचारी गस्त घालण्यासाठी बाहेर गेल्याने दोघांना तक्रार द्यायची असल्याने तेथे कोणीच नसल्याने वैतागून त्यातील एकाने चौकीतील टेबलवरील वस्तुने चौकीतील कांचाचे नुकसान केले. वारजे माळवाडी भागात दोन टोळक्‍याच्या वादातून कायम दहशतीचे वातावरण असते. किरकोळ वादात अचानक टोळक्‍याकडून पार्किंग केलेल्या वाहनांची तोडफोड केली जाते. आज या घटनेचा फटका पोलिसांच बसला आहे. याबाबत जाम्या नावाच्या सराईतावर भादवि कलम 427 अन्वये वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून लवरकच त्याला अटक करण्यात येणार असल्याची माहिती वारजे माळवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मोळे यांनी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)