वारकऱ्यांसाठी विविध पक्ष, संघटनांकडून अन्नदान

पुणे – संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराज व जगद्‌गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यात सहभागी वारकऱ्यांसाठी शहरातील विविध पक्ष व संघटनांकडून चहा, नाष्टा आणि अन्नदान वाटप करण्यात आले. तर, याचा शेकडो वारकऱ्यांनी लाभ घेतला. पालखी सोहळ्यानिमित्त शहरातील विविध ठिकाणी विशेष धार्मिक व कीर्तनाचे कार्यक्रमही घेण्यात आले. या कार्यक्रमामुळे संपूर्ण पुणे शहर भक्तीमय झाल्याचे दिसून आले.

शक्ती सोशल फाउंडेशनच्या
संगमवाडी व सहकारनगर येथे आलेल्या वारकऱ्यांचे शक्ती फोरम फाउंडेशनच्या अध्यक्षा समीरा गवळी यांच्या हस्ते प्रथम गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर वारकऱ्यांना नाष्टा, चहा आणि पाणी वाटप करण्यात आले. यावेळी सोहीनी डांगे, सुनिता तावरे, निशा गायकवाड, आसिफ शेख, विक्रांत सावंत, दिपाली मुळे यांचे सहकार्य मिळाले.

राष्ट्रवादी महिला कॉंग्रेस पार्टी, शिवाजीनगर
गोखलेनगर येथे गणराज प्रतिष्ठानच्या अध्यक्षा व संघटनेच्या माजी अध्यक्षा ऍड. पद्‌मा गोळे यांनी आळंदी येथील गणेशानंद महाराज पुणेकर यांच्या दिंडीचे स्वागत केले. पालखी सोहळ्यानिमित्त किर्तनाचा कार्यक्रमही घेण्यात आला. तर, सहभागी झालेल्या वारकऱ्यांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. यावेळी रेखा धरजगावकर, कांता गवळी, मनीषा गोरे, अलका काळडोके, अनिता दौंडकर, संध्या लहाटे यांचे सहकार्य मिळाले.

प्रियदर्शनी शिक्षण संस्था
संस्थेच्या वतीने हभप अशोक महाराज हुंडे यांच्या दिंडीचे स्वागत करण्यात आले. यावेळी रामायणाचार्य ह.भ.प. अशोक महाराज हुंडे यांचे सांप्रदायिक कीर्तन झाले. त्यानंतर संस्थेच्या वतीने वारकऱ्यांना नाष्टा, चहा देण्यात आला. याप्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा शशीकला कुंभार, महेश कुंभार, वर्षाराणी कुंभार आदींचे सहकार्य मिळाले.
जयभवानी टेक्‍निकल इन्स्टिटयूट
वारकऱ्यांसाठी पिठलं-भाकरी या महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेच्या अध्यक्षा कल्पना उनवणे, राधिका मखामले यांच्या मार्गदर्शनाखाली मंगेश थोरात, कीर्ती शिंदे, विशाल गोते, संजय अभंग, उदय लेले, कोमल वाळुंजकर यांनी प्रयत्न केले.

युनियन क्रिकेट क्‍लब

वारकऱ्यांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. क्‍लबचे अरविंद शिवले, सुभाष जाधव, अमित शिंदे, संजय नांगरे, अनिता शिवले आणि शैलेजा शिंदे यांनी भोजन वाटपात मोलाची कामगिरी बजावली. पुणे शहर कॉंग्रेस कमिटीच्या वतीने कसबा पेठेत आलेल्या सर्व वारकऱ्यांना पोहे आणि चहा वाटप करण्यात आले. यासाठी योगेश भोकरे, विजय घुमे, राहुल डाकणे, सचिन रौदाळे, विनय वाळूंज आदींनी प्रयत्न केले.

पुणे महानगरपालिका सार्वजनिक वाचनालय

पालखी सोहळ्यातील वारकरी बांधवांना जगातील घडामोडी समजाव्यात या उद्देशाने लकडीपूल विठ्ठल मंदिर व खंडोजीबाबा मंदिर येथे दैनिक, श्री हरीपाठाचे वितरण करण्यात आले. वारकऱ्यांना बिस्किटे वाटप करण्यात आले. या विशेष उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी वाचनालयाचे संस्थापक-अध्यक्ष अनिल अगावणे, ललितकुमार अगावणे, राम तोरकडी, किशोर चांडक, सुभाष तोंडे, नंदकिशोर दळवी आदींचे सहकार्य मिळाले.

रामभाऊ दत्तात्रय गणपुले यांच्या वतीने भंडारा डोंगर प्रासदिक दिंडी, हवेली व नवनाथ प्रासदिक दिंडीतील सुमारे 250 वारकऱ्यांसाठी जेवणाची आणि राहण्याची व्यवस्था करण्यात आली. युवा
सामाजिक संस्था, पुणे यांच्यातर्फे पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना माजी पीएमटीचे चेअरमन भिमराव पाटोळे यांच्या हस्ते फळे वाटप करण्यात आले. यावेळी संस्थेचे संस्थापक पिटर सोनावणे, कार्याध्यक्ष नरेश धोत्रे, सदस्य गफरभाई स्टोवाले, आशफाक भाई, गणेश डोबांळे यांचे सहकार्य मिळाले.

नवसम्राट तरुण मंडळ

सोमवार पेठेतील वारकरी बांधवांना चहा, नाष्टा, अन्नदान, शबनम बॅग व जीवनाश्‍यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब लडकत, कुमार लडकत, बंडू गवळी, निलेश गोसावी, राजू एनगुल्ला, रेश्‍मा शिंदे यांनी सहकार्य केले.

रमाबाई महिला विकास संस्था

भवानी पेठेत आलेल्या वारकऱ्यांना सकाळी नाष्टा आणि चहाचे वाटप केले. संस्थेच्या अध्यक्षा मायावती चित्रे, विमल कर्डीले, हेलन लोखंडे, वनिता झोंबाडे, श्रध्दा खरात आदींनी प्रयत्न केले. तरुण मंडळ व युवा प्रतिष्ठानच्या वतीने सुमारे 500 वारकऱ्यांना साबण, शाम्पू, कंगवा या वस्तूंचा समावेश होता. चेतन मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.

मंजितसिंग विरदी फाउंडेशन

वारकऱ्यांना पाण्याच्या बाटल्या आणि फळाचे वाटप करण्यात आले. तर, महाराष्ट्र टेम्पो संघटनांतर्फे टिंबर मार्केट परिसरातील वारकऱ्यांना नाष्टा, चहा, गुडदाणी आणि फळांचे वाटप करण्यात आले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत मोरे यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्त्यांचे सहकार्य लाभले.

श्री शिवाजी प्रिपरेटरी मिलिटरी कर्मचारी सहकारी पतपेढी

संस्थेच्या 50 वर्षातील पदार्पणानिमित्त संतश्रेष्ठ श्री संत ज्ञानेश्‍वर माऊली आणि जगद्‌गुरू तुकाराम महाराज पालखीतील वारकऱ्यांना अन्नदान करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष सचिन कुलकर्णी, उपाध्यक्ष अजय मते, सचिव प्रवीण शिंदे, खजिनदार प्रकाश ढेकणे यांच्यासह सर्व संचालक मंडल व्‌ सभासद उपस्तित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)