वारकऱ्यांमुळे पुणे-नाशिक महामार्ग दिंडीमय

मंचर- नाशिक, मुरबाड व कल्याण येथून आलेल्या वारकऱ्यांमुळे मंचर येथील पुणे-नाशिक रस्ता गुरुवारी (दि. 29) दिंडीमय झाला. 3 डिसेंबर रोजी एकादशीनिमित्त आळंदीची यात्रा आहे. याकरिता पायी दिंडी आळंदीकडे जात असून वारकऱ्यांना ग्रामस्थांच्या वतीने अन्नदान करण्यात आले. कार्तिक महिन्यात प्रचंड थंडीची असताना ही दिंडीतील वारकरी ज्ञानोबा-तुकाबोचा गजर करीत खांद्यावर पताका घेऊन दिंडीत सहभागी झाले आहेत. कळंब येथील भीमाशंकर कारखान्याचे माजी संचालक यशवंत कानडे, विष्णू भालेराव, ज्ञानेश्‍वर भालेराव, विजय भालेराव, मोहन भालेराव, विलास कानडे, शिवसेना उपतालुका प्रमुख संतोष डोके यांच्यासह अन्य मान्यवरांनी दिंडी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांना अन्नदान व चहापानाची व्यवस्था केली. कळंब येथील वैद्यकीय व्यवसायिक डॉ. बाळकृष्ण थोरात यांनी वारकऱ्यांना मोफत औषधे दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)