वारकरी संप्रदाय आणि शीख धर्मियांच्या अतूट नात्याचे दर्शन

नेवासा -वारकरी संप्रदाय आणि शीख धर्मियांतील अतूट नात्याचे अनोखे दर्शन संत ज्ञानेश्‍वरांची नेवासे नगरी गेली 22 वर्षे अनुुभवते आहे. शहरातील गुरुनानक दरबारच्या वतीने यंदा देखील देवगड दिंडीचे उत्साहात स्वागत करण्यात आले. या परंपरेने धार्मिक ऐक्‍याचा नवा आदर्श राज्यासमोर ठेवला आहे.

गुरुनानक दरबार व सिंधी पंजाबी बांधवांच्या वतीने देवगड दिंडीच्या स्वागताची परंपरा ग्यानचंद विखोना यांनी 22 वर्षांपूर्वी सुरू केली होती ती आजतागायत सुरू आहे.
दिंडीचे गुरुनानक दरबारमध्ये सोमवारी सकाळी 9 वाजता आगमन झाले. यावेळी गुरुनानक दरबारच्या वतीने सेवेकरी दर्शनसिंग यांनी भास्करगिरी महाराज यांचे पुष्पहार घालून स्वागत केले. त्यांनी गुरुवाणी पठन केली. संत सेवेकरी प्रेमचंद विखोना यांनी प्रास्ताविक केले.
यावेळी भास्करगिरी महाराज म्हणाले की, सर्वच संतांनी मानव हीच जात व मानवता हाच धर्म ही शिकवण दिली. गुरुगोविंदसिंह व गुरुनानक यांनी देखील मानवजातीच्या कल्याणासाठी कार्य केले. वारकरी संप्रदायाचे शीख धर्मियांशी असलेले नाते परंपरेनुसार चालत आले आहे. हीच परंपरा माउलींच्या या भूमीत सुरू आहे ही मोठी अभिमानास्पद बाब आहे.
यावेळी पोलीस निरीक्षक संपतराव शिंदे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सतीश मुळे, पत्रकार सुधीर चव्हाण यांनी दिंडीतील वारकऱ्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी एकनाथराव भगत, महावीर शिंगी, रमेश ओस्तवाल, योगेश काळे, अनिल शिंगी, बाळू महाराज कानडे, पत्रकार भाऊसाहेब गंधारे, रमेश शिंदे, शंकर नाबदे, पवन गरुड, स्वप्निल शिंगी, हभप भाऊसाहेब मोरे, आदी मान्यवर उपस्थित होते. बालुशेठ विखोना यांनी आभार मानले. यावेळी वारकऱ्यांना अल्पोपहार देण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)