“वारकरी काकडा भजनी’चे प्रकाशन

राजगुरूनगर- चिखलगाव (ता. खेड) येथील हभप निवृत्तीमहाराज मुके यांनी तालुक्‍यातील वारकऱ्यांचे गुरुवर्य हभप भिकाजीबाबा बच्चे वाजवणेकर यांचे चरित्र व वारकरी काकडा भजनी मालिकेची पहिली आवृत्ती मुंबई येथे प्रकाशित करण्यात आली. गुरुवर्य हभप भिकाजीबाबा बच्चे वाजवणेकर यांचे चरित्र व काकडा भजनी मालिकेची पहिली आवृत्ती महाराष्ट्र युवक राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सरचिटणीस डॉ. शैलेश मोहिते पाटील यांच्या हस्ते आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी किरण मूके, चिखलगावचे सरपंच रामदास मुके, राम गोपाळे, गबाजी मूके, गणेश घोंगे, उद्योजक मनोहर पोखरकर, दत्तात्रय वांळूज, दत्तात्रय घोंगे, लक्ष्मण भोर, संजय बोरकर, संतोष सांवत, अंकूश जाधव, किरण लायगूडे, सूजित मूके, संजय गोपाळे, दिलीप गोपाळे, दिनेश धंद्रे आदीसह वारकरी उपस्थित होते. सुत्रसंचालन सुनिल दौंड यानी केले तर आभार किरण मुके यानी केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)