वारकरी करणार स्वच्छतेचा जागर

-विद्यार्थीही होणार सहभागी
-टाळ मृदंगाच्या गजर अन्‌ विठुनामाच्या जयघोषाने गावोगावी होणार प्रबोधन

निवास सुतार

मल्हारपेठ  – स्वच्छ भारत सुंदर भारत या केंद्र शासनाच्या अभियानाला अनुसरून महाराष्ट्र राज्य वारकरी साहित्य परिषद आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने सातारा जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद शाळा आणि गावागावात वारकरी परिषदेच्या वतीने स्वच्छतेचा जागर करण्यात येवून स्वच्छ भारत अभियानांतर्गत प्रबोधनाचे काम हाती घेण्याचा संकल्प करण्यात आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत या संकल्पनेला अनुसरून महाराष्ट्र शासनाने स्वच्छता अभियानातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मिशनला बळकटी येण्यासाठी महाराष्ट्र राज्य वारकरी साहित्य परिषदेची मदत घेत गावोगावी किर्तन व प्रवचनाच्या माध्यमातून जनजागृती करण्याचा निर्णय घेतला आहे. विधानसभेच्या अधिवेशनामध्ये वारकरी परिषदेमार्फत सर्व गावागावात प्रवचन आणि प्रबोधनात्मक किर्तनातून स्वच्छतेचा संदेश देण्याची घोषणा केली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या अभियानाचा पहिला टप्पा थोड्याच दिवसात सातारा जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांमधून शालेय विद्यार्थ्यांना बरोबरच घेवून केली जाणार असल्याची माहिती वारकरी साहित्य परिषदेचे सातारा जिल्हाध्यक्ष ह.भ.प. मधुकर दीक्षित यांनी मल्हारपेठ येथील आयोजित मेळाव्यात दिली.

दरम्यान दि 11 डिसेंबर रोजी वारकरी परिषदेच्या सदस्यांचे एक दिवसीय राज्यस्तरित मेळावा मुंबई येथील विधानभवानात आयोजित करण्यात आला होता. यात राज्यातील 1000 हजार वारकऱ्यांनी सहभाग घेतल्याचे त्यांनी सांगितले. ग्राम स्वच्छते विषयीची माहिती वारकरी परिषदेचे तालुकानिहाय प्रवचनकार, कीर्तनकार, प्रत्येक शाळांचे वर्गिकरण करुन प्रबोधनाद्वारे स्वच्छतेचा जागर याविषयी माहिती देणार आहेत. वारकरी परिषदेच्या सदस्य, जिल्हा परिषद शाळांचे केंद्रप्रमुख व बिट अंतर्गत येणाऱ्या शाळांच्या मुख्याध्यापक, शिक्षकांना बरोबर घेवून स्वच्छता अभियानाची माहिती देणार आहेत. त्यांना सहकार्य करण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील आणि संत साहित्याचे आभ्यासक डॉ. संदानंद मोरे यांनी केले आहे.

स्वच्छतेचा संदेश गावागावात पोहोचला तर ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न कमी होणार आहे. सर्व साथीचे आजार हे अस्वच्छतेमुळेच होत असतात. त्याला आळा बसू शकेल म्हणूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि स्वच्छता पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्या सहकार्याने व वारकरी परिषदेमार्फत कार्य हाती घेण्यात आले आहे. ग्रामीण भागात आजही भजन-किर्तनाचे कार्यक्रम मोठ्या जोमाने सुरू होत आहे. या माध्यमातून दिलेला संदेश लोकांच्या मनावर बिंबतो. गावांमध्ये धार्मिक वातावरण निमिर्ती होते. गावातील पुरूष मंडळींबरोबरच महिला वर्गही याला आवर्जून उपस्थिती लावतात. त्यामुळे हा उपक्रम अतिशय प्रयोगशील पद्धतीने साजरा करण्याचा शासनाचा हेतू आहे.

धार्मिकतेबरोबरच सामाजिक हेतूही यातून साध्य होणार आहे. दरम्यान स्वच्छतेचा जागर या अभियानामार्फत जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांकडून स्वच्छतेबाबत एक आश्वासक फॉर्म भरून घेतला जाणार आहे. यात स्वच्छतेची शपथ दिली जाणार आहे यामुळे आपोआपच स्वच्छतेबाबत जागृती होणार आहे. आणि स्वतः बरोबरच घरातील इतरानांही या अभियानाबाबत हे विद्यार्थी जनजागृती करतील. यामध्ये भाग घेणाऱ्या प्रबोधनकारास राज्य सरकार व वारकरी परिषदेमार्फत योग्य मानधन देण्यात येणार आहे.

यासाठी पाटण तालुक्‍यातील मल्हारपेठमध्ये लवकरच वारकरी सांप्रदायाचा मेळावा घेवून या अभियानाला सहकार्य करण्याचे आवाहन परिषदेचे जिल्हाध्यक्ष गुरूवर्य संतचरणरज मधुकर दीक्षित, पाटण तालुकाध्यक्ष आनंदराव देसाई महाराज यांनी केले. यावेळी पाटण तालुका वारकरी परिषदेचे पदाधिकारी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)