वारंवार वीजपुरवठा खंडीत झाल्यास अधिकाऱ्यांवर जबाबदारी

ऊर्जामंत्र्यांचे महावितरणला आदेश

पुणे – वीजपुरवठा खंडीत होऊ नये, यासाठी आवश्‍यक देखभाल व दुरुस्तीचे काम करण्यात यावे. जर एखाद्या परिसरात वारंवार वीजपुरवठा खंडीत होण्याचे प्रकार आढळून आल्यास त्याची जबाबदारी निश्‍चित करून संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महावितरणच्या प्रशासनाला दिले आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

प्रकाशभवन येथे महावितरण व महापारेषणच्या पुणे जिल्ह्यातील कामांचा आढावा ऊर्जामंत्री यांनी घेतला. यावेळी सर्वाधिक वीजपुरवठा खंडित होत असलेल्या परिसरांची व विभागांची नावे बावनकुळे यांनी जाणून घेतली. नागरिकांना सुरळीत वीजपुरवठा देण्यासाठी वीजयंत्रणेवर बारीक लक्ष ठेवावे व खंडित होण्याचे नेमक्‍या कारणांवर कायमस्वरुपी उपाययोजना करावी. वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडल्यास त्याचा कालावधी कमीतकमी राहिल, यासाठी प्रयत्न करण्याची सूचना यावेळी ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी दिली.

दरम्यान, पुणे जिल्ह्यातील महापारेषणच्या विविध उपकेंद्राची सुरू असलेली कामे जलदगतीने पूर्ण करण्यासाठी संबंधित कंत्राटदारांविरुद्ध कठोर भूमिका घ्यावी. प्रसंगी त्यांना काळ्या यादीत समाविष्ट करून नव्या कंत्राटदारांना कामे देण्याचे आदेश बावनकुळे दिले. यावेळी महावितरणचे मुख्य अभियंता सचिन तालेवार, सुनील पावडे, महापारेषणचे मुख्य अभियंता रोहिदास मस्के आदी अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)