वारंवार वाहतूक नियमभंग; 200 जण रडारवर

वारंवार वाहतूक नियमभंग; 200 जण रडारवर

पुणे, दि.2- वाहतूक नियमांचा वारंवार भंग करणाऱ्या वाहनांची यादी तसेच चालकांच्या नावांची यादी पोलिसांनी तयार केली आहे. यात 200 जणांचा समावेश असून ही यादी वाहतूक पोलिसांच्या संकेतस्थळावर प्रसारित करण्यात आली आहे.

वाहतूक पोलिसांकडून गेल्या वर्षीपासून नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर सीसीटीव्ही कॅमेजयांच्या माध्यमातून कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. या माध्यमातून वारंवार नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांची यादी पोलिसांनी तयार केली आहे. त्यापैकी एका वाहनचालकांवर नियमभंग केल्याबाबतचे सर्वाधिक 32 खटले दाखल आहेत. काही जणांनी दंड भरला नाही. पोलिसांनी दंडाच्या रक्कमेचा संदेश मोबाइल क्रमांकावर पाठवूनही काही वाहनचालकांनी रक्कम भरली नसल्याचे समोर आले आहेत. अशा वाहनचालकांचा यादीत समावेश करण्यात आला आहे. दंड न भरणारे 100 वाहनचालक असल्याचे आढळून आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)