वारंवार पुरवणी मागण्या मांडून सरकार जनतेची दिशाभूल करत आहे – जयंत पाटील

मुंबई: वारंवार पुरवणी मागण्या मांडून सरकार जनतेची दिशाभूल करत आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते जयंत पाटील यांनी केला आहे.

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आजही सरकारने २० हजार कोटींच्यावर पुरवणी मागण्या मांडल्या आहेत. यापूर्वी मांडलेल्या पुरवणी मागण्यांचा विनियोग सरकारने केलेला नसतानाही पुन्हा नवीन पुरवणी मागण्या मांडल्या जात आहेत, असे पाटील यांनी स्पष्ट केले.

-Ads-

सरकारने आधीच अनेक विभागांच्या खर्चाला कात्री लावली आहे. त्यामुळे सरकारने आतापर्यंत मंजूर झालेल्या पुरवणी मागण्यांचा खर्च सभागृहात मांडावा, अशी मागणी पाटील यांनी आज विधानभवनाबाहेर माध्यम प्रतिनिधींशी बोलताना केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)