वारंवार घडणाऱ्या मोबाईल चोऱ्यांकडे वाई पोलिसांचे दुर्लक्षच

वाईच्या आठवडी बाजारात चोऱ्यांचे सत्र थांबता थांबेना

मेणवली  – गेल्या काही महिन्यांपासून वाईच्या आठवडी बाजारात मोबाईल चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. वारंवार घडणाऱ्या चोऱ्यांच्या घटनांमुळे वाईकर नागरिकांसह बाजारात खरेदी-विक्रीसाठी येणारे व्यापारी, शेतकरी तसेच ग्राहकही त्रासले असून वाईचा बाजार म्हटल की “भीक नको पण कुत्रं आवरा’ अशा प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. मात्र, पोलिसांकडून या चोऱ्या थांबविण्यासाठी कोणतेही विशेष प्रयत्न होत नसल्याने पोलिसही चोरट्यांपुढे हतबल झाले की काय? असा हसास्यस्पद सवाल उपस्थित होऊ लागला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सोमवार हा वाईच्या आठवडी बाजाराचा दिवस. या बाजारात केवळ वाई तालुक्‍यातूनच नव्हे तर महाबळेश्‍वर, कोरेगाव, खंडाळा, फलटण तालुक्‍यांसह पोलादपूर, महाडपासून व्यापारी, शेतकरी तसेच ग्राहक येत असतात. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून बाजारपेठेत येणाऱ्या ग्राहकांसह विक्रेते व्यापारी अन्‌ शेतकऱ्यांना मोबाईल चोरट्यांनी चांगलेच टार्गेट केले आहे. बाजारात येणाऱ्या लोकांचे महागडे मोबाईल नजर ठेवून चोरटे लंपास करत आहेत. याप्रकरणी संबंधितांकडून वारंवार वाई पोलिसांत चोरीच्या तक्रारीही दाखल केल्या आहेत. परंतु, पोलिसांकडून कोणतीही ठोस कार्यवाही झालेले नाही. जवळपास वर्षभरापासून मोबाईल चोरीचे सत्र सुरु आहे. मात्र, या प्रकरणातील एकाही चोरट्याला पकडण्यात वाई पोलिसांना यश आलेले नाही ही दुर्दैवाची बाब आहे.

वाईच्या बाजारात ग्रामीण भागातील जनतेसह शहरातील सर्व चाकरमानी भाजीपाला खरेदी करण्यासाठी येत असल्याने बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी असते. खरेदीकरता बाजारात आलेले नागरिक खरेदीत मग्न असताना गर्दीचा फायदा घेवून चोरटे पुरुषांच्या वरील खिशातील मोबाईल बरोबरच महिलांच्या हातातील पाकीट हातोहात लंपास करत पसार होत आहेत.
मोबाईल चोरांच्या टोळीत पुरुष, महिला व किशोरवयीन मुला-मुलींचाही समावेश असल्याचे काही नागरिकांतून बोलले जात आहे. हे चोर अत्यंत चलाख असल्याने आजपर्यत पोलिसांच्या हाताला लागत नाहीत? की लागूनही पकडले जात नाहीत? याचे उत्तर जनतेला मिळत नसल्याने दर सोमवारी बाजारात जाताना वाईकर नागरिकांना धडकी भरत आहे. विशेषत: वाई नगरपालिका ते कराड अर्बन बॅंक, मासळी बाजार व जिल्हा मध्यवर्ती बॅंक या तीनच ठिकाणी या चोराकडून मोबाईलच्या चोऱ्या केल्या जात आहेत.

मोबाईल चोरी होऊन तक्रार गहाळ झाल्याची मोबाईल चोरीला गेल्याचे लक्षात आल्यावर फोन लावण्याचा प्रयत्न केल्यास नॉट रिचेबल लागतअसल्याने नागरिक पोलीस ठाण्याचा रस्ता धरत आहेत. मोबाईल चोरीची तक्रार घेवून आलेल्या नागरिकाची चोरी होवूनही मोबाईल चोरीची तक्रार घेण्याऐवजी गहाळ झाला अशी तक्रार नोंदवून वाई पोलीस आपली तपासाची जबाबदारी टाळत जनतेची बोळवण करत आहेत. शिवाय तक्रारदारांवर पोलिसांकडून प्रश्‍नाच्या भडीमार होत असल्याने “भीक नको पण कुत्रं आवरा’ अशी गत होत असल्याने अनेकजण तक्रार न करताच घरचा रस्ता धरत आहेत.
वाई नगरपालिकेचे सी.सी.टीव्ही कॅमेरे नुसते शो पीस ठरले असून सदर यंत्रणेच्या देखभालीच्या बिलाची रक्कम अदा करण्यासाठी कदाचित वाई नगरपालिका प्रशासनाकडे निधीच नसल्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोक्‍याच्या ठिकाणी बसवलेले कॅमेरे गेली दोन वर्षे बंद अवस्थेत असल्याने चोरट्यांचे काम सोईस्कर पार पडत आहे तर नगरपालिकेची जनतेप्रति कार्यतत्परता व्यवहारशून्य दिसून येते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)