वायसीएम रुग्णालयात रेबीज लसीचा तुटवडा

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात गेल्या आठवडाभरापासून रेबीज लसीचा तुटवडा जाणवत आहे. लस उपलब्ध करुन देण्याबाबत रुग्णालयाच्या मध्यवर्ती भांडार विभागाकडे मागणी करुनही त्याचा पुरवठा केला गेलेला नाही. तसेच, गेल्या काही दिवसापासून इतर आजारांचीही औषधे रुग्णालयात नसल्याने अनेकांना गैरसोईचा सामना करावा लागत आहे.

वायसीएम रुग्णालयात भोसरी, चाकण, निगडी, पिंपरी, चिंचवड आदी परिसरातून उपचारासाठी नागरिक येतात. या रुग्णालयातील रुग्णांना औषधे व विविध आजारांवरील लस उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी रुग्णालयाची आहे. मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून औषधांचाही तुटवडा जाणवत आहे.

रुग्णालयात औषधांचा तुटवडा जाणविण्याआधी त्याचा पुरवठा होणे आवश्‍यक असते. मात्र, रुग्णालयानेही भांडार विभागाकडे अनेकदा औषधांची मागणी करुनही त्याचा पुरवठा केला जात नाही. रुग्णांच्या गैरसोईचा परिणाम आरोग्यावर होत आहे.

शहर व परिसरात कुत्रा चावल्यानंतर तत्काळ रेबीजची लस देण्याची सुविधा वायसीएम रुग्णालयात केली आहे. मात्र, गेल्या रविवारपासून लसीची कमतरता जाणवत आहे. रुग्णालयात एखादा रुग्ण रेबीज लस घेण्यासाठी आल्यानंतर त्याला ससूनमध्ये जाण्याच्या सूचना केल्या जात आहेत. त्या कालावधीत एखादा रुग्णाचा हकनाक जीव जाण्याची शक्‍यता आहे.

गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयात रेबीज लसीचा तुटवडा जाणवत आहे. याबाबत मध्यवर्ती भांडार विभागाला पत्र देऊन मागणी केली आहे. रेबीज लस उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
डॉ. मनोज देशमुख, अधिक्षक, वायसीएम रुग्णालय.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)