“वायसीएम’ला रेबीज लसीचा “डोस’!

पिंपरी – महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात गेल्या पंधरावड्यात रेबीज प्रतिबंधक लसीचा तुटवडा जाणवू लागला होता. लस वेळेत उपलब्ध होत नसल्यामुळे रुग्णांना ऐनवेळी दुसरा पर्याय शोधावा लागत होता. मात्र, सद्यस्थितीत वायसीएम रुग्णालयात रेबीज प्रतिबंधक लस पुरेशा प्रमाणात उपलब्ध झाली असल्याची माहिती, रुग्णालयाच्या औषध भांडार विभागाने दिली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरासह राज्यभरातील विविध भागातून पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात अनेक आजारांवरील उपचार घेण्यासाठी रुग्णांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. मात्र, काही दिवसांपूर्वी रुग्णालयात श्वानदंशावरील लस उपलब्ध नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना ऐनवेळी धावपळ करावी लागत होती. लस संपल्याने कित्येक रुग्णांमध्ये पुण्यातील ससून रुग्णालयात हलविण्यात आले होते.

सद्यस्थितीमध्ये वायसीएमच्या औषध भांडारामध्ये 20 लस शिल्लक असून काही लस रुग्णालयाच्या तातडीक विभागामध्ये देण्यात आलेल्या आहेत. मागील काही दिवसांमध्ये शहरामध्ये भटक्‍या कुत्र्यांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. शहरात श्वानदंशाच्या अनेक घटना घडलेल्या आहेत. मात्र, लस अभावी रुग्णालय प्रशासन हतबल होते. सध्या, लस उपलब्ध झाल्याने श्वानदंश झालेल्या रुग्णांची गैरसोय टळणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)