“वायसीएम’ला बेवारस वाहनांचा गराडा

पिंपरी – महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाच्या (वायसीएमएच) आवारात मोठ्या प्रमाणात बेवारस वाहने आहेत. यामुळे, रुग्णालयातील डॉक्‍टर व कर्मचाऱ्यांच्या वाहनांना जागा अपुरी पडत असून त्यांची वाहने रुग्णालयाच्या बाहेर लावावी लागत आहेत. त्यामुळे हतबल झालेल्या रुग्णालय प्रशासनाने अखेर पोलिसांना कळविले आहे.

वायसीएम रुग्णालयाच्या आवारात रुग्णालयातील डॉक्‍टर व कर्मचाऱ्यांची सुमारे 65 ते 70 वाहने आहेत. परंतु, रुग्णालयाच्या आवारात 250 हून अधिक वाहने उभी असतात. तसेच, काही वाहने गेल्या अनेक दिवसांपासून बेवारस स्थितीत पडून असल्याचेही आढळून आलेली आहेत. काही व्यवसायिक दमदाटी व धमकावून वाहने लावत असल्याने काही सुरक्षा रक्षकांनी सांगितले.

-Ads-

रुग्णालयाच्या आवारात शहरासह राज्यभरातून रुग्ण उपचारासाठी येतात. त्यांना भेटण्यासाठी येणाऱ्या नातेवाईकांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. यासाठी, रुग्णालयाच्या आवारात एका बाजूला “पे पार्किंग’ आहे. मात्र, काही जण दुसऱ्या बाजूला असलेल्या मोफत “पार्किंग’मध्ये वाहने लावतात. परंतु, मोफत “पार्किंग’मधील वाहने कित्येक दिवस रुग्णालयाच्या आवारात पडून असल्याचे दिसून आले आहे. सकाळच्या सुमारास डॉक्‍टर व कर्मचाऱ्यांना वाहने लावण्यास जागा नसल्याने नाहक मनःस्ताप सहन करावा लागत आहे.

रुग्णालयाच्या परिसरात वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कारवाई केली जात आहे. तसेच, रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त असून याबाबत वाहन चालकांनीही नियमांचे पालन करणे आवश्‍यक आहे. रुणालयाच्या आवारात बेकायदेशीर वाहने उभी आहेत अशा वाहनांसंदर्भात पोलिसांना कळविणे आवश्‍यक असल्याचे, पिंपरी वाहतूक पोलीस निरीक्षक उमेश तावसकर यांनी संगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)