“वायसीएम’मध्ये रेबीज लसीचा तुटवडा

पिंपरी – महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात गेल्या दोन दिवसांपासून रेबीज लसीचा तुटवडा जाणवत आहे. मागील आठवड्यात भांडार विभागात 20 लसींचा साठा होता. मात्र, सद्यस्थितीत लसीचा साठा संपल्याने रुग्णांना मोठ्या गैरसोईला सामोरे जावे लागत आहे. रुग्णालयात दिवसाला दहा ते बारा लसींची आवश्‍यकता असूनही या गंभीर स्थितीकडे दुर्लक्ष केले जात आहे.

वायसीएम रुग्णालयात भोसरी, चाकण, निगडी, पिंपरी, चिंचवड आदी परिसरातून उपचारासाठी नागरिक येतात. या रुग्णालयातील रुग्णांना औषधे व विविध आजारांवरील लस उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी आरोग्य विभागाची आहे. मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून औषधांचाही तुटवडा जाणवत आहे. रुग्णालयात औषधांचा तुटवडा जाणविण्याआधी त्याचा पुरवठा होणे आवश्‍यक असते. मात्र, रुग्णालयानेही भांडार विभागाकडे अनेकदा औषधांची मागणी करुनही त्याचा पुरवठा केला जात नाही.

-Ads-

रेबीज लस संपल्याने वायसीएम रुग्णालयामधून रुग्णांना पुण्यातील ससूनमध्ये पाठविले जात आहे. परंतु, पिंपरी-चिंचवड अंतर्गत येणाऱ्या रुग्णांना रेबीज लस देण्यास ससून नकार देत असल्याचे रुग्णांच्या नातेवाईकांनी सांगितले. तसेच, शहर व परिसरात कुत्रा चावल्यानंतर त्यांच्यावर रेबीजच्या लस व्यतिरिक्त इतर उपचार नसल्याने रेबीज लस गरजेची आहे. मात्र, वायसीएम रुग्णालयात लस उपलब्ध नसल्याने एखादा रुग्णांचा हकनाक जीव जाण्याची शक्‍यता आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)