वायसीएममध्ये डॉक्‍टरांच्या हंगामी भरतीस मान्यता

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयातील डॉक्‍टरांची संख्या अपुरी आहे. ही बाब लक्षात घेत 22 वरिष्ठ आणि 47 कनिष्ठ डॉक्‍टरांची नियुक्ती करण्यास स्थायी समितीने मान्यात दिली आहे. ही नियुक्ती हंगामी स्वरुपाकरिता असणार आहे.

वायसीएम रुग्णालयात सध्या 19 वरिष्ठ आणि 54 कनिष्ठ डॉक्‍टर्स कार्यरत आहेत. मात्र ही संख्या अपुरी आहे. त्यामुळे वायसीएम रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना पुरविल्या जाणाऱ्या वैद्यकीय सेवेवर याचा परिणाम होत आहे.

याबाबत अनेकदा महासभेत वादळी चर्चा झाली आहे. त्यानंतर ही त्रुटी दूर करण्यासाठी मनुष्यबळ भरती करण्याचे आश्‍वासन प्रशासनाच्या वतीने देण्यात आले होते. त्यानंतर हंगामी स्वरुपात स्टाफ नर्स व इतर आवश्‍यक जागा भरण्यात आल्या आहेत. त्यापाठोपाठ कमतरता जाणवणाऱ्या डॉक्‍टरांची भरती करण्यास स्थायीने मान्यता दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)